फूड इंडस्ट्री हा भरभराटीची सदैव संधी असलेला उद्योग आहे. आपलं वेगळेपण आणि गुणवत्ता यांच्या जोरावर यातला कुठलाही उद्योग कितीही मोठा होऊ शकतो, टेस्टी बाईट ग्लोबलचं उदाहरण तर याबाबतीत समर्पक आहे.
सेवाक्षेत्रात आज अग्रेसर असलेलं नाव म्हणजे बीवीजी. अनेक मोठ्या आस्थापनांपासून हॉस्पिटल्समध्ये सफाई कामासाठी सगळी यंत्रणा आणि कामगार पुरवणं, तसंच उत्तम सेवेची हमी देणारी कंपनी म्हणजे बीवीजी. हणमंतराव गायकवाड नावाच्या एका मराठी माणसानं ही कंपनी उभारुन कशी नावारुपाला आणली, त्याचीच ही गोष्ट.
2000 च्या सुमारास भारतात आय.टी.ची बूम आली. बहुसंख्यांनी आय.टीत नोकऱ्या करणं सुरु केलं. पण केवळ नोकरी न करता आय.टी.त असा उद्योग उभा करणं की ज्यातून इतरांना नोकऱ्या देता येतील, असा धाडसी प्रयत्न नरेंद्र काळेंनी केला, ऐकुया त्यांची यशोगाथा.
कुटूंबात कोणतीही उद्योगाची पार्श्वभूमी नसताना इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणं, इतकंच नव्हे तर स्वबळावर तो उद्योग नावारुपाला आणणं, हे अजिबात सोपं नाही. अनेक आव्हानांशी सामना करत यशस्वी उद्योजक बनलेल्या उद्योजकाची ही कहाणी म्हणूनच प्रेरक आहे.
डिझाईनिंग म्हणजे कोणतीही गोष्ट आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी केलेली कलाकुसर असा सर्वसाधारण समज असतो. प्रत्यक्षात डिझाईनिंग खूपच व्यापक संकल्पना आहे. कोणतीही वस्तू ही ती वापरण्याच्या दृष्टीने सोयीस्कर, दीर्घकाळ उपयुक्त करणारी बनवणं आणि त्याचबरोबर त्या वस्तूमध्ये सुबकपणा, नेटकेपणा ठेवणं हा ती वस्तू बनवताना केलेल्या डिझाईनमागचा विचार असतो आणि यालाच डिझाईनिंग म्हणतात. मग वस्तू कोणतीही असो. क्रिएटिव्हिटीला पुरेपूर स्कोप देणाऱ्या या व्यवसायाविषयी उलगडून सांगत आहेत, डिझाईनिंगच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या एलिफंट डिझाइन्सच्या अश्विनी देशपांडे…