Browse audiobooks narrated by Asmita Dabhole, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Capital in the 21st Century - Thomas Piketty
"२१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले आहे."
Deepa Deshmukh (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Manufacturing Consent - Edward Herman & Noam Chomsky
"आपल्या प्रचारासाठी कॉर्पोरेटस आणि अमेरिकन सरकार सर्व माध्यमांचा वापर कसं करते, मिडीयामध्ये येण-या बातम्या एकतर्फी आणि वरिष्ठ वर्गाच्या बाजूला कशा असतात याबद्दल एडवर्ड हर्मान आणि नोम चोम्सकी यांनी मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. माध्यमांचा अतिरेकी वापर कसा टाळावा, अनेक स्त्रोतांचा वापर करून आपलं मत कसं बनवावं, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत प्रश्न कसे विचारायला हवेत असं लेखकद्वयी आपल्याला सांगतात"
Deepa Deshmukh (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Trupti Dhakte - Gharatun Sheti Utpanna Hati
"घरातल्या परसबागेत घरापुरता भाजीपाला हौसेने पिकवणारे बरेच असतात. पण आपल्याकडीस मर्यादित जागेत मश्रूम सारखे पीक घेऊन त्यातून यशस्वी उद्योग घडवणारे अतिशय कमी . तृप्ती धाकटे यांनी अशीच आपल्या परसबोगतुन मश्रूमसारख्या नाजूक पीकाची शेती सुरू केली आणि घरातल्या शेतीतून त्यांच्या हाती चांगले उत्पन्नही येऊ लागले."
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Swati Kulkarni - Beautiful Business
"अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी..."
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
"सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...!"
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Small is Beautiful - Earnst Fredrik Schumacher
"अर्न्स्ट फ्रेडरिक शुमाकर हा एक जर्मन -ब्रिटीश संख्याशास्त्रज्ञ आणि अर्थतज्ञ होता. १९७३ साली त्यानं स्मॉल इज ब्युटिफूलः अ स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स ॲज पीपल मॅटर्ड या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. दुस-या महायुध्दानंतर प्रकाशित झालेल्या १०० प्रभावशाली पुस्तकांपैकी हे एक मानलं जातं. या पुस्तकाने अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहाला धक्का लावण्याचं काम केलं. लष्कर आणि भौतिक सुविधा देऊन विकास होत नाही. नैसर्गिक साधनांचा मर्यादित वापर करून मानवी कल्याण साधता येईल हा विचार त्याने मांडला."
Deepa Deshmukh (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Maithili Appalwar Shettalyacnhi Udyogini
"शेततळी कशी तयार करावीत, त्यामागे काहीएक शास्त्रीय आराखडा असतो, अभ्यास असतो. असा सखोल अभ्यास करून या पुरुषप्रधान क्षेत्रात पाय रोवलेल्या स्त्रीची - मैथिली अप्पलवार यांची गोष्ट."
Aditi Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Silent Spring - Richel Karson
"सायलेंट स्प्रिंग या रॅचेल कार्सन लिखित पुस्तकात निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर चर्चा करण्यात आली आहे. पृथ्वीवर असलेली माती, पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड यांबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रॅचेल हिनं या पुस्तकात केली आहे. शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणा-या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचलने सरकारकडे केली होती. निसर्गतज्ञ डेव्हिड ॲटनबरो यांच्या मते, चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे, की ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली."
Deepa Deshmukh (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rainbow Day Care Center Jyeshthanche Palanaghar
"घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे."
Vrushali Joglekar (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Art of Loving Aani Erik From
"प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते. असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन -अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. तसंच तो माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. १९५६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला. प्रेम ही देण्याची किंवा अशी कृती आहे की ती विनाअपेक्षा, विनाअट करायला हवी. प्रेम हे एका संकुचित परिघात बसत नाही, तर ते वैश्विक आहे. व्यापक आहे."
Deepa Deshmukh (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Me Gruhini Me Udyogini
"एका गृहिणीनं घरापासून, प्रायोगिक तत्वावर सुुरु केलेला आणि पुढे वाढतच गेलेला, इतरही गृहिणींना त्यात सामावून घेणारा, त्यांना उद्योगिनी बनवणारा असा हा उद्योग आहे तरी कोणता? चला ऐकुया"
Jyotsna Naik (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
[Marathi] - Apace Assal Bhartiy Brandchi Kahani
"नाईक, आदिदास, रिबॉक, प्युमा असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडस खेळाडुंना लागणारे विशिष्ट डिजाईनचे शूज आणि कपडे बनवतात. प्रत्येक खेळाच्या वैशिष्टयानुसार ते डिजाईन केलेले असतात. तरूण वर्गात हे ब्रँडस लोकप्रियही आहेत . पण सायकलिंग, ट्रायथॉलन आणि रनिंग या खेळांसाठी कुणीच काही बनवत नाही हे आदित्य केळकर या उद्योजकाच्या लक्षात आलं आणि आपली अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन त्याचे ॲपेस हा ब्रँड बनवला. ॲपेस या ब्रँडची त्याने बनवलेली खेळांसाठीची वस्त्रंप्रावरणं अल्पावधीत लोकप्रिय झाली."
Jyotsna Naik (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer