आपण श्रीमंत व्हावं, भरपूर पैसे कामवावेत असं जवळपास प्रत्येकाचं माणसाला वाटत असतं. पण पैसे कमावणं, पैशांचं व्यवस्थापन ही किचकट गोष्ट आहे. ती प्रत्येकाला जमतेच असं नाही. म्हणून श्रीमंत कसं व्हावं आणि पैसे कसे टिकवून ठेवावेत याचं मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या लाखो प्रति खपतात. यातील रिच़ डॅड पुअर डॅड आणि थिंक ॲंड ग्रो रिच या दोन गाजलेल्या पुस्तकांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत...
सध्याचे जग कसे आहे असा प्रश्न कणालाही विचारला तर साधारणपणे जी उत्तरे येतात त्यात आपले जग फार वेगवान होत चालले आहे असे बरेच जण म्हणतात. अनेकांना नेमकं काय चालले आहे ते समजतच नाही. पुढे काय होणार? आपल्या मुलांचे काय होणार? आपल्या गुंतवणूकीचे आणि भविष्याचे काय होणार या चिंतेने जो तो हैराण असतो. पूर्वी ज्याप्रमाणे पुढील पाच पन्नास वर्षांचे नियोजन करता यायचे, एकदा नोकरी मिळाली की चिंता नाही असे अनेकांना वाटायचे. पण आता इतके संदर्भ बदलले आहेत की आपण ज्या मल्टीनॅशनल कंपनीचे भविष्यच सांगता येत नाही तर नोकरीचे भविष्य कसे सांगणार असे तरूण मुले विचारू लागले आहेत. दूर देशात चाललेल्या युक्रेन आणि रशियासारख्या जागतिक पातळीवर घडणा-या युध्दांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होत असेल असा विचारही पूर्वी मनात येत नव्हता. पण आता थेट देशाच्या अर्थकारणावर या युध्दांचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला युध्दाची झळ महागाईच्या रूपाने पोहचू लागली आहे.
फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!