Browse audiobooks narrated by Rasika Kulkarni, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan
"अयोध्या… गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्यप्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येतील रंजन्मभूमीचा वाद अखेर निकालात निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत झालं. या ऐतिहासिक निकालामुळे ७० वर्षं जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला."
Pratik Kosake (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kamala - Amerikecha Ashavaad
"कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म आणि हार्वर्डमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या राज्यातच त्या स्टेट अॅटर्नी बनल्या. ५६ वर्षांच्या कमला यांनी उपाध्यक्ष होण्याआधीही अनेक 'पहिल्या'चे विक्रम नोंदवले आहेत."
Pratik Koske (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye....
"दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत हे जाणून घेऊया.. चला तर मग!"
Gaurav Muthe (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kalidaar Kapuri Paan
"भारतातल्या कुठल्याही शहरात जा, तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. तसा भारतात पानाचा इतिहास खूप जुना आहे."
Pratik Koske (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Trundhannye Poshak Mulyancha Sarvottam Strot
"यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विषयाचा ओझरता उल्लेख केला. त्यावर फारशी चर्चा माध्यमांनीही घडवून आणली नाही. तो विषय म्हणजे शासकीय पातळीवर तृणधान्य उत्पादनाला देशभरात प्रोत्साहन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यावर्षी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंम्बलीव्हामध्ये एक ठराव पास करण्यात आला. त्यानुसार २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्राने 'इयर ऑफ मिलेट्स' म्हणून घोषित केलंय. त्याला अनुसरूनच भारत आता येत्या काळात मिलेट्स, म्हणजेच तृणधान्य उत्पादन आणि संशोधन यावर भर देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या निमित्ताने भारतात राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी तृणधान्यं महत्त्वाची का आहेत, आणि सरकारने त्यासाठी येत्या काळात कोणती धोरणे ठरवली आहेत, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत."
Purva Bhise (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shane Warne - The Great Magician
"साल आहे १९९३. इंग्लंडमधले उन्हाळ्यातले दिवस आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा चालू. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरला बहुचर्चित अॅशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग चालू आहे. माईक गॅटिंग खेळतोय. समोरून गोबरे गाल, गळ्यात सोन्याची साखळी, ओठाला आणि नाकाला सनस्क्रीन लोशन थापलेला, फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आणि सोनेरी केसांचा एक २३-२४ वर्षांचा मुलगा ओव्हर द विकेट बोलिंग करायला आलाय. त्याच्या पहिल्या अॅशेसच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या स्पेलमधला पहिलाच चेंडू.`"
Kedar Oak (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - V for Victim ki V for Victory?
"स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे. त्यांचे ते उत्तम पोशाख, रेड कार्पेटवर त्यांचं चालणं, त्या जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराझींची झुंबड, त्यांचा कॅमेऱ्यासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर, त्यांचं ते डोळे लखलखून टाकणारं ग्लॅमर. पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजू आहे, ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. कास्टिंग काऊच, त्यांचं सतत होणार 'बॉडी शेमिंग', त्यांच्या लैंगीक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह, सोशल मीडियावर होणारं कंबरेखालचं ट्रोलिंग, आजूबाजूला जवळचे मित्रच शिल्लक न राहिल्याने त्यांच्यावर आलेलं एकटेपण, आणि असे अनेक पैलू या काळोख्या बाजूला आहेत. आज आपण मनोरंजन क्षेत्रातल्या अशा काही स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी या अन्यायकारक आणि काळोख्या बाजूबद्दल आवाज उठवला. या स्त्रिया कदाचित सगळ्यात मोठ्या स्टार नसतील, त्यांचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते नसतील, त्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत नसतील पण या खऱ्या रॉकस्टार आहेत. कारण त्यांनी फक्त व्हिक्टीम होण्याचं नाकारलं, आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला."
Amol Udgirkar (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vishwache Art Latadidi
"फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!"
Prasad Mirasdar (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Coronanantarcha Aavhan
"दोन वर्षांच्या अंतराने ऑफलाईन परीक्षा घेतल्यानंतर पेपर लिहिताना एका तासाने विद्यार्थ्यांचे हात थरथरू लागले.' अशी एक विचित्र बातमी तुम्ही ऐकली असेल. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या आणि इतके दिवस घरीच राहिल्यामुळे मुलांची शाळेची सवय मोडली, त्यामुळे त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होतोय, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. हे असं का होतंय? लहान मुलं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणींचा सामना का करतायत? या सगळ्याचं मूळ आहे कोविड काळात उद्भवलेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाशी! या बदलेल्या मानसिकतेबद्दल आणि तिचा सामना कसा करावा याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत."
Mayur Ranade (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
"अनेक स्त्री शास्त्रज्ञानी आपल्या वेगवेगळ्या संशोधनाने जगाला ललायभूत केले आहे आणि त्यांच्या संशोधनांचा गाजवजही झाला आहे. आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पर्यावरण आणि मानव वंशशास्त्रात स्त्रियांनी संशोधनाचा फार मोठा वाट उचलला आहे. प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण सुद्धा केले आहे. या पुस्तकात दिग्गज महिलांच्या संशोधनाची माहिती दिली आहे."
Niranjan Sinhendra Ghate (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius Lise Meitner
"लीझ माइटनर ही एक थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती. ज्यू धर्म त्यागूनही ज्यू ठरवली गेल्याने जर्मनीतून हद्दपार झाली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिली. मूळची ऑस्ट्रियन असणा-या लीझने आपल्या अणुविखंडनातील संशोधनाने आभिमानास्पद कामगिरी केली. ... आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुद्धा सहका-यांकडून हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातील थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती.... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाच्या विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचे हे उत्कंठवर्धक चरित्र ऐकायलाच हवे....!"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatiya Genius Jayant Naralikar
"डॉ. जयंत विष्णू नारळीकरांचे नाव माहिती नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. हे प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्"
Achyut Godbole, Deepa Deshmukh (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer