Browse audiobooks by Pratik Kosake, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya
"भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय, हे आज जाणून घेऊया…"
Pratik Kosake (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan
"अयोध्या… गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्यप्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येतील रंजन्मभूमीचा वाद अखेर निकालात निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत झालं. या ऐतिहासिक निकालामुळे ७० वर्षं जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला."
Pratik Kosake (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vadanagar Te Delhi - Narendra Modicha Rajkiya Pravas
"गेल्या दशकाच्या सुरुवातीला भारताच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरु झाला. आजवर व्यक्ती म्हणून स्वतःचा प्रभाव देशावर टाकू शकणाऱ्या काही मोजक्या नावांपैकी एक नाव २०११ - १२ सालच्या सुमारास भारताच्या राजकीय पटलावर झळकू लागलं, ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी. साधारण २०१२ पासून पुढचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहरा भाजपने राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. त्याआधी भाजपमधील कुशल संघटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात तयार झालेलं जनमत आणि 'गुजरात मॉडेल'चं भाजपने उभं केलेलं चित्र, यांचा परिणाम म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच भारतात स्पष्ट बहुमत मिळवलं. अर्थात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेल्यामुळे भाजपने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच निवडलं. १६ मे २०१४ या दिवशी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे गेली एकूण ८ वर्षे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांचा राजकीय प्रवास कसा होता, वडनगरपासून दिल्लीपर्यंत ते कसे पोहोचले, आणि पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची कारकीर्द कशी होती, हे आपण आज जाणून घेणार आहोत."
Pratik Kosake (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Avgha Rang Ek Zala
"आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रदेशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव! पंढरपूरची यात्रा आणि विठ्ठल हा पारंपरिक मराठी समाजमानसाचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू आहे. महाराष्ट्रभरातून शेकडो पालख्या 'ग्यानबा तुकारामचा' अखंड जयघोष करत आषाढी एकदशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. चंद्रभागेचा काठ भक्तिरसात न्हाऊन निघतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म.. भेदाभेद भ्रम, अमंगळ… हा बीजमंत्र घेऊन वारकरी जन विठोबाच्या चरणी लीन होतात. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा अव्याहतपणे चालत आली आहे. पंढरपूरच्या विठोबाकडे आणि आषाढीच्या वारीकडे असं कोणतं संचित आहे, की जे महाराष्ट्रावर इतकी संकटं, परकीय आक्रमणं येऊनही टिकून राहिलं? मुळात विठ्ठल या दैवताचा इतिहास काय? या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत…"
Pratik Kosake (Author), Pratik Kosake (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shahu Maharaj - Rajarshi - Lokottar Rajacha Jeevanpat
"एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सांध्यावर भारतात ब्रिटिश सरकारचा एकछत्री अंमल होता. या इंग्रज राजवटीच्या विरोधातला लढा हळूहळू तीव्र होत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर भारतात घडून येत होतं. ते स्थित्यंतर म्हणजे भारतात झालेली प्रबोधनाची चळवळ. महाराष्ट्रात महात्मा फुले यांच्यापासून जे प्रबोधन पर्व सुरू त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवला. या प्रबोधन पर्वातलं महत्त्वाचं पुष्प म्हणजे राजर्षी शाहू महाराज! भारतात झालेल्या सुधारणावादी क्रांतीचा इतिहास छत्रपती शाहूंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यंदाचं वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं स्मृतीशताब्दी वर्ष! त्यानिमित्त त्यांचं कार्य काय होतं आणि आजपर्यंत त्याचा ठसा कसा आणि कुठे जाणवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…"
Pratik Kosake (Author), Pratik Kosake (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bhajapchya Hindutavachi Prayogshala
"पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. चार राज्यांत भाजपने सत्ता मिळवली असली, तरी या निवडणुकांच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल घडून आली. त्याचं एक कारण असं, की गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री दोन टर्म सत्ता मिळवू शकला नव्हता. योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं. सलग ५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर निवडणूक जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. योगी यांच्या या यशाचं रहस्य काय, त्यांना पुन्हा सत्तेत आणताना उत्तर प्रदेशातील जनमत कोणता संदेश देऊ पाहतंय, आणि योगी यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणी म्हणून असलेलं वेगळेपण येत्या काळात कसं वळण घेईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!"
Pratik Kosake (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung
"सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे. निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येतंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी याआधीही एकदोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला, आणि त्यावर चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन'. खरंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही भूमिका घेत आलेत, पण अशी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणं शक्य आहे का? त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा उहापोह आपण आज करणार आहोत."
Pratik Kosake (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Biryani Asa Shodh, Asa Pravas...
"बिर्याणी... नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? वेगवेगळ्या रुपात आपण कितीतरी वेळा बिर्याणीची लज्जतदार चव चाखली असेल, पण या बिर्याणीचा शोध कुठे लागला, आणि ती भारतात कशी बरं आली... याचा विचार केलाय कधी? चला तर, आज जाणून घेऊया बिर्याणीच्या शोधाची आणि प्रवासाची रंजक कथा..."
Pratik Kosake (Author), Pratik Kosake (Narrator)
Audiobook
[Marathi] - 'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan?
"जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे १६ टक्के लोकसंख्या भारतात राहते, पण जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त ४ टक्के जलस्रोत भारतात आहेत. भारताच्या ७०० जिल्ह्यांपैकी २५६ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी चिंताजनक आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मोठं आव्हान आहे. भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन चतुर्थांश कुटुंबांना आजही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कुटुंबांना पाण्याच्या अशुद्ध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकार गेल्या २ वर्षांपासून एक योजना राबवतंय... 'जल जीवन मिशन'!"
Pratik Kosake (Author), Pratik Kosake (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer