Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Pratik Kosake
Browse audiobooks narrated by Pratik Kosake, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रदेशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव! पंढरपूरची यात्रा आणि विठ्ठल हा पारंपरिक मराठी समाजमानसाचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू आहे. महाराष्ट्रभरातून शेकडो पालख्या 'ग्यानबा तुकारामचा' अखंड जयघोष करत आषाढी एकदशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. चंद्रभागेचा काठ भक्तिरसात न्हाऊन निघतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म.. भेदाभेद भ्रम, अमंगळ… हा बीजमंत्र घेऊन वारकरी जन विठोबाच्या चरणी लीन होतात. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा अव्याहतपणे चालत आली आहे. पंढरपूरच्या विठोबाकडे आणि आषाढीच्या वारीकडे असं कोणतं संचित आहे, की जे महाराष्ट्रावर इतकी संकटं, परकीय आक्रमणं येऊनही टिकून राहिलं? मुळात विठ्ठल या दैवताचा इतिहास काय? या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत…"
"एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सांध्यावर भारतात ब्रिटिश सरकारचा एकछत्री अंमल होता. या इंग्रज राजवटीच्या विरोधातला लढा हळूहळू तीव्र होत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर भारतात घडून येत होतं. ते स्थित्यंतर म्हणजे भारतात झालेली प्रबोधनाची चळवळ. महाराष्ट्रात महात्मा फुले यांच्यापासून जे प्रबोधन पर्व सुरू त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवला. या प्रबोधन पर्वातलं महत्त्वाचं पुष्प म्हणजे राजर्षी शाहू महाराज! भारतात झालेल्या सुधारणावादी क्रांतीचा इतिहास छत्रपती शाहूंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यंदाचं वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं स्मृतीशताब्दी वर्ष! त्यानिमित्त त्यांचं कार्य काय होतं आणि आजपर्यंत त्याचा ठसा कसा आणि कुठे जाणवतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…"
"बिर्याणी... नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? वेगवेगळ्या रुपात आपण कितीतरी वेळा बिर्याणीची लज्जतदार चव चाखली असेल, पण या बिर्याणीचा शोध कुठे लागला, आणि ती भारतात कशी बरं आली... याचा विचार केलाय कधी? चला तर, आज जाणून घेऊया बिर्याणीच्या शोधाची आणि प्रवासाची रंजक कथा..."
"जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे १६ टक्के लोकसंख्या भारतात राहते, पण जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त ४ टक्के जलस्रोत भारतात आहेत. भारताच्या ७०० जिल्ह्यांपैकी २५६ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी चिंताजनक आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मोठं आव्हान आहे. भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन चतुर्थांश कुटुंबांना आजही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कुटुंबांना पाण्याच्या अशुद्ध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकार गेल्या २ वर्षांपासून एक योजना राबवतंय... 'जल जीवन मिशन'!"