Browse audiobooks by Pratik Koske, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Rahul Dravid - Bharatiya Cricket Madhla Kharakhura Gentlemen
"प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वाहवा होत असते. तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो. बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा मारा झेलणारी, सर्व पुढे नायक ठरणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करणारी तटबंदी तिथेच असते. स्थितप्रज्ञ. जसजसा या गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सरकतो तसतसे योद्धे कालवश होतात. मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी, तोफगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते. ती या इतिहासाची साक्ष देत असते. त्यावेळी या तटबंदीचे महत्व उमजते. ही तटबंदी नसती तर आपले हे गौरवशाली योद्धे पराक्रम गाजवू शकले असते का? असा प्रश्नही आपल्या मनाला शिवून जातो. राहुल द्रविड ही अशीच अनेक तोफगोळ्यांच्या खुणा घेऊन जगणारी ऐतिहासिक भिंत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या संयमी खेळाच्या बळावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारा अवलिया! कसा होता राहील द्रविडच्या 'द वॉल' बनण्याचा प्रवास? जाणून घेऊया…"
Pratik Koske (Author), Vishwaraj Joshi (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kamala - Amerikecha Ashavaad
"कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म आणि हार्वर्डमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या राज्यातच त्या स्टेट अॅटर्नी बनल्या. ५६ वर्षांच्या कमला यांनी उपाध्यक्ष होण्याआधीही अनेक 'पहिल्या'चे विक्रम नोंदवले आहेत."
Pratik Koske (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Amrutmahotsavi Bharat
"१४ ऑगस्ट १९४७ ची रात्र. दीडशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून भारत मुक्त झाला तो दिवस. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना उद्देशून भाषण केलं. त्या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इ.असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे. शिवाय 'सामाजिक समता' ही आपल्या समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे. सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे. 'लोकशाही' हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे. आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वातंत्र्य'."
Pratik Koske (Author), Nihal Rukdikar (Narrator)
Audiobook
[Marathi] - 'NATO' cha Pudhe Kay Honar ?
"फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्की काय आहे, आणि रशिया-युक्रेन युद्धात 'नाटो'ची भूमिका काय आहे, हे जाणून घेऊया…"
Pratik Koske (Author), Vishwaraj Joshi (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rajkarnat Striyancha Sahbhag
"तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण हे मूलमंत्र असलेल्या एकविसाव्या शतकातील आधुनिक काळात आपण वावरतो आहोत. मागच्या काही शतकांचा, विशेषतः एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास पाहिल्यास जगभरात सर्वत्र झालेल्या स्वातंत्र्याच्या, प्रबोधनाच्या आणि समतेच्या चालवली ठळकपणे नजरेत भरतात. फ्रेंच राज्यक्रांती असो वा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देणारी अमेरिकन चळवळ असो… या सगळ्यातच स्त्रियांच्या मूलभूत हक्कांची आणि स्त्री- पुरुष समानतेची विश्वव्यापी मांडणी करण्यात आली. त्याचीच फळे आपण आज एकविसाव्या शतकात चाखत आहोत. सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आज आपला वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. पण ही प्रक्रिया खरंच अपेक्षित वेगाने घडतेय का? मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या राजकीय क्षेत्रात स्त्रिया सध्या कुठे आहेत? त्यांचा राजकारणातील सहभाग पुरेसा आहे का? नसेल तर त्याची कारणं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं चाचपडून पाहण्याचा हा एक प्रयत्न…"
Pratik Koske (Author), Arundhati Kamathe (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sarvarkar - Vidnyannishtha Samajkrantikarak
"विनायक दामोदर सावरकर... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आणि प्रबोधनाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नाव. अनुयायी आणि विरोधकांनी कायम चर्चेत ठेवलेल्या सावरकरांच्या विचारांचं सध्या वरचेवर होत असणाऱ्या वादांच्या पलीकडे जाऊन चिंतन क्वचितच होत असावं. हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते, भारतीयत्वाची व्याख्या करणारे विचारवंत म्हणून सावरकर ओळखले जातात. पण या ओळखीच्या पलीकडे जाऊन विज्ञाननिष्ठा, बुद्धीवाद आणि समाजक्रांतीचे विचार मांडणारे सावरकर आपल्या विचारविश्वात दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले. जातउच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे या पुस्तकांतून त्यांनी समाजक्रांती, अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर आपले विचार मांडले. आजच्या काळातही त्या विचारांची उपयोगिता कायम आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत."
Pratik Koske (Author), Pratik Koske (Narrator)
Audiobook
[Marathi] - Saman Nagrik Kaydhya Baddal Sarvakahi Part 2
"समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय, हे आपण गेल्या भागात समजून घेतलं. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ प्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायदा अंतर्भूत आहे. राज्याने असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावा असं मार्गदर्शन अनुच्छेद ४४ मध्ये करण्यात आलं आहे. आपण संविधान स्वीकारलं त्याला आता ७२ वर्षे होत आहेत, पण अजूनही समान नागरी कायदा तयार होऊ शकला नाही. याला काही कारणं आहेत, ती या निमित्ताने जाणून घेणं आवश्यक आहे."
Pratik Koske (Author), Pratik Koske (Narrator)
Audiobook
[Marathi] - Saman Nagrik Kaydhya Baddal Sarvakahi
"गेल्या महिनाभरापूर्वी कर्नाटकातल्या एका महाविद्यालयात हिजाब वरून सुरू झालेला वाद देशभरात प्रचंड गाजला. या वादात दोन्ही बाजूच्या संघटनांनी उडी घेतली आणि माध्यमांनीही या प्रकरणाला प्राईम टाइम चर्चांमध्ये स्थान दिलं. या निमित्ताने हिजाब, तीन तलाक, मुस्लिम वैयक्तिक कायदा, हे विषय पुन्हा एकदा चर्चेला आले. याच सोबत आणखी एक मुद्दा दबक्या आवाजात समोर येऊ लागला, तो असा की हिजाब किंवा युनिफॉर्मच्या वादातून सरकारला 'युनिफॉर्म सिव्हिल कोड' म्हणजे समान नागरी कायद्यासाठी वातावरण निर्मिती करायची आहे. या निमित्ताने समान नागरी कायद्यावर मंथन सुरू झालं. खरंतर या कायद्याबाबत चालू असलेली चर्चा आपल्याला नवीन नाही. भाजपच्या प्रत्येक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हा कायदा नक्की आहे तरी काय, त्याचा संवैधानिक आधार काय आणि असा कायदा येणं शक्य आहे का, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!"
Pratik Koske (Author), Pratik Koske (Narrator)
Audiobook
[Marathi] - Kalidaar Kapuri Paan
"भारतातल्या कुठल्याही शहरात जा, तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. तसा भारतात पानाचा इतिहास खूप जुना आहे."
Pratik Koske (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Labharthi Model Bhajapchi Matadan Hami Yojana
"गेल्या महिन्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने सत्ता हस्तगत केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलंय. या निवडणुका म्हणजे २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे असं मानलं, तर येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजप सत्ता राखणार हेच दिसून येतंय. पण या सगळ्या गणितीय अकडेमोडीच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर चिंतन केलं जातंय, तो प्रश्न असा, की भाजप सातत्याने का जिंकतंय? नोटबंदी, इंधनाचे वाढते भाव, महागाई असे अनेक नकारात्मक मुद्दे असूनही भाजप सत्ता स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी कशी ठरतेय? या सगळ्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे भाजपचं 'लाभार्थी मॉडेल'! हे मॉडेल नक्की काय आहे, आणि याचा मतदारांवर कसा प्रभाव पडतोय, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!"
Pratik Koske (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nivadanuk Rokhe : Pardarshakta He Diwaswapnach!
"राजकीय पक्ष हे भारताच्या संसदीय लोकशाहीच्या काही सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणावं लागेल. भारतात बहुपक्षीय लोकशाही पद्धती अस्तित्त्वात आहे. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्ष आणि प्रत्येक राज्याच्या पातळीवर काही प्रादेशिक पक्ष, अशी एक साधारण रचना आपल्याकडे आहे. हे पक्ष दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक तर लढताततच, पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा सहभाग मोठा असतो. हे पक्ष चालण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. हा निधी कसा जमा करावा, कसा खर्च करावा आणि त्याचं ऑडिट कसं केलं जावं हा नेहमीच भारतात चर्चेचा विषय राहिलाय. याचाच एक भाग म्हणजे इलेक्टोरल बॉण्ड्स, अर्थात निवडणूक रोखे. राजकीय पक्षांना निधी जमा करण्यासाठी ही पद्धत वापरण्याची परवानगी गेल्या ५ वर्षांपूर्वी अरुण जेटली अर्थमंत्री असताना देण्यात आली. खरंतर यावर त्याच्या आधीपासूनच दीर्घकाळ चर्चा सुरु होती. हे इलेक्टोरल बॉण्ड्स म्हणजे नक्की काय, आणि त्याचा वापरयोग्य की अयोग्य, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग.."
Pratik Koske (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Urdu Pe Sitam Kyon Hai?
"संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या 'इर्शाद' या मराठी गजल आणि कवितांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेत, दिवाळीच्या औचित्याने उर्दू नाव असलेला कार्यक्रम घेऊ नये असा फतवा गेल्या वर्षी काढला गेला होता. त्यानंतर दोन्ही कवींनी नाव बदलणार नसल्याचं सांगितलं आणि आयोजकांना कार्यक्रम मागे घ्यावा लागला. त्यानंतर एकंदरच मराठी भाषेत उर्दू, फारसी, अरबी भाषेतून आलेले शब्द आणि हिंदू संस्कृतीचे 'उर्दूकरण' वगैरे विषयावर चर्चा सुरू झाली. उर्दू ही मुस्लिमांची भाषा, म्हणून दिवाळीनिमित्त उर्दू शब्द नको असे आक्षेप घेणाऱ्यांचे मत होते. हा सगळा संस्कृतीसंरक्षणाचा वाद आणि त्यावरची मते वगैरे बाजूला ठेवली तरी उर्दू भाषा आणि तिचे भारतातील स्थान हा महत्वाचा विषय आहे आणि त्यावर चर्चा होणंही तितकंच महत्वाचं आहे."
Pratik Koske (Author), Sayee Diwate (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer