"दोन वर्षांच्या अंतराने ऑफलाईन परीक्षा घेतल्यानंतर पेपर लिहिताना एका तासाने विद्यार्थ्यांचे हात थरथरू लागले.' अशी एक विचित्र बातमी तुम्ही ऐकली असेल. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या आणि इतके दिवस घरीच राहिल्यामुळे मुलांची शाळेची सवय मोडली, त्यामुळे त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होतोय, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. हे असं का होतंय? लहान मुलं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणींचा सामना का करतायत? या सगळ्याचं मूळ आहे कोविड काळात उद्भवलेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाशी! या बदलेल्या मानसिकतेबद्दल आणि तिचा सामना कसा करावा याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत."