Browse audiobooks by Deepa Deshmukh Achyut Godbole, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Genius Marie Curie
"मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. अशा या महान शास्त्रज्ञाचे जीवन जाणून घ्या..."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Ratnaprabha Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatiya Genius S. S. Swaminathan
"डॉ. एम.एस. स्वामिनाथन (जन्म : कुंभकोणम, ७ ऑगस्ट, इ.स. १९२५ - ) हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला.भारतीय गरीब शेतकर्"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Swapnil Rajshekhar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Alan Mathison Turing
"आज आपण संगणकाच्या तंत्रज्ञानात जी काही प्रगती पाहतो आहोत त्याचे श्रेय अँलन ट्युरिंग या संशोधकाला द्यायला हवे. अँलन ट्युरिंगने प्रोग्रामिंग भाषा शोधली त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता या संगणक शाखेचा जनकही ट्युरिंगच आहे. एवढ्या मोठ्या संशोधनाचा जनक असुनही त्यांच्या वाट्याला समाजाचा आदर आला नाही. अँलन ट्युरिंगना समलैंगिक असल्याने कायम समाजाची अवहेलना आणि दुःखच वाट्याला आले. शेवटी परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली....! आजच्या संगणकयुगातील सर्वात प्रभावी संशोधकाची ही जीवनकहाणी नक्कीच ऐकण्याजोगी आहे...!"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Nikola Tesla
"निकोला टेसला (जुलै १०, इ.स. १८५६: स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.पेटंट आणि बाजारपेठ शोधू शकणारा शोध विकसित करण्याचा प्रयत्न करीत टेस्लाने यांत्रिक ऑसीलेटर / जनरेटर, विद्युत स्त्राव नळ्या आणि लवकर एक्स-रे इमेजिंगचे प्रयोग केले. त्याने वायरलेस-नियंत्रित बोट देखील बनविली, जी पहिल्यांदा प्रदर्शित झाली. टेस्ला हे एक शोधक म्हणून परिचित झाले... जाणून घेऊया त्यांचे जीवन..."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Vishwaraj Joshi (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius John Logie Baird
"१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने 'बेअर्ड टेलिव्हिजन' नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली.बेअर्ड-हॅचिन्सन या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकांसाठीचे पहिले प्रक्षेपण ३० सप्टेंबर १९२९ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त १९ जणांनी! दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या.प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे फेब्रुवारी १९४६ मध्ये निधन झाले. आज दूरचित्रवाणीने आपले आयुष्य व्यापले आहे. त्याच्या जन्मदात्याचे चरित्र नक्कीच ऐकायला हवे..."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Wright brothers
"राइट, ऑर्व्हिल : (१९ ऑगस्ट १८७१—३० जानेवारी १९४८). विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमान उद्योगाची सुरूवात करणा-या राईट बंधूंच्या चरित्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. इथे जाणून घेऊया त्यांनी ही भरारी कशी घेतली..."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Zaheid Bagwan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Guglielmo Marconi
"गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Zaheid Bagwan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Steve Jobs
"स्टीव्ह जॉब्ज - तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिध्द जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Sunil Patil (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Thomas Alva Edison
"थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय 'ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला होता. असा हा एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावले म्हणूनच त्याची जीवनकहाणी सर्वात प्रभावी आहे."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Rohit Potnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius Richard Feynman
"रिचर्ड फिलिप्स फाइनमन हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला होता. त्यांचेच हे प्रेरणादायी चरित्र !"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Rajan Joshi (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius Lise Meitner
"लीझ माइटनर ही एक थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती. ज्यू धर्म त्यागूनही ज्यू ठरवली गेल्याने जर्मनीतून हद्दपार झाली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिली. मूळची ऑस्ट्रियन असणा-या लीझने आपल्या अणुविखंडनातील संशोधनाने आभिमानास्पद कामगिरी केली. ... आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुद्धा सहका-यांकडून हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातील थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती.... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाच्या विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचे हे उत्कंठवर्धक चरित्र ऐकायलाच हवे....!"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Rasika Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius J. Robert Oppenheimer
"'या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!' असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्याच्या अखेरीला त्याला अत्यंत क्लेशकारक जीवन कंठावे लागले. प्रत्यक्ष अणुबॉंबच्या बनवण्यात सहभागी असल्याने एकीकडे त्याला अणुबॉंबचा जनक म्हणून गौरविले गेले तर दुसरीकडे मृत्यूनंतरही अवहेलनाच त्याच्या वाट्याला आली. त्याचे चरित्र म्हणूनच ऐकण्यासाठी रंजक आहे."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer