Browse audiobooks by Sanjay Sonawani, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Demin ani Kale Vishwa
"पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी गायब झालेले गूढ मंत्रांचे एक बाड शोधत शेवटी पोचला देमीन रहात असलेल्या अरुंद दरीतील वस्तीत. तेथून सुरु झाले भयंकर उत्पात. अद्भुताने भरलेले रहस्यमय धाडसी पाठलाग. आपल्यातही अचाट अद्भुत शक्ती आहेत ही देमीनला जाणीव झाली ती त्या शक्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर. द्रेकाच्या काळ्या विश्वात शिरून देमीन विजय प्राप्त करू शकला का? आपल्या ग्रहाला काळ्या शक्तीच्या तावडीतून मुक्त करू शकला का? क्षणोक्षणी अद्भुताच्या पसाऱ्यात खेचत नेणारी आणि एकाहून एक विलक्षण पात्रे असलेली संजय सोनवणी लिखित कादंबरी ऐका संचित वर्तक यांच्या आवाजात!"
Sanjay Sonawani (Author), Sanchit Wartak (Narrator)
Audiobook
"राहुल आणि कविताची नजर चुकवून मीनाक्षी तृतीय नेत्र ताब्यात घेऊन सटकली खरी, पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अपार बुद्धिमत्ता वापरत ती शत्रूना मात द्यायचा अथक प्रयत्न करत होती... आणि ज्यासाठी तिने एवढा अट्टाहास केला होता त्या तृतीय नेत्राची अखेर नियती तरी काय होती? मुळात मीनाक्षी होती तरी नेमकी कोण ? तिचे काय झाले अखेर ? राहुल आणि कविता आपण कष्टाने शोधलेल्या पण पुन्हा आपल्या हातातून गायब झालेल्या तृतीय नेत्राच्या शोधात जीव धोक्यात घालून पोलीस व ऍड गणेश गायकवाडच्या मदतीने कष्ट घेत होते खरे, पण उलगडले का त्यांना तृतीय रत्नाचे आणि त्यासाठी एवढा रक्तपात का चालू आहे यामागील रहस्य ? विलक्षण रहस्याने ओथंबलेल्या, चक्रावून टाकणाऱ्या या वादळी कथेत मानवी संवेदना गोठवून टाकण्याचे सामर्थ्य आहे !"
Sanjay Sonawani (Author), Pari Telang (Narrator)
Audiobook
"शिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते. शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते. भविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला पाहिजे, यावरचे चिंतन या पुस्तकात आले आहे. प्रत्येकाने वाचावे आणि बोध घ्यावा असे हे क्रांतिकारी पुस्तक !"
Sanjay Sonawani (Author), Vishakha Sonawale (Narrator)
Audiobook
"शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते. संभाजी महाराज शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. अपयशी अकबर शेवटी महाराष्ट्रात येतो. संभाजी महाराजांचा आश्रय घेतो. आपल्याच पुत्राला फितवले म्हणून चवताळलेला औरंगजेब संभाजीमहाराजांच्या नाशासाठी महाराष्ट्राची वाट धरतो. त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याला कैद करून ठार मारण्याचाही बेत संभाजी महाराज आखतात, पण इकडे रायगडावर खुद्द संभाजी महाराजांच्याच हत्येचा कट शिजलेला असतो. अकबरामुळे तो कट उघडकीला येतो आणि दोषी मंत्री आणि त्यांच्या साथीदारांना हत्तीच्या पायी तुडवून मारले जाते. सत्ताभिलाषा, त्यासाठी केली आणि घडवली जाणारी क्रूर नाट्ये एकीकडे तर मानवी स्नेहबंध टिकवण्यासाठी किंवा स्वप्नांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेली किंवा होणारी भावनाट्ये दुसरीकडे यांच्या संमिश्र खेळातून मानवी प्रेरणा नेमक्या कशा वर्तन करतात याचा शोध घेत ही कादंबरी साकार होते."
Sanjay Sonawani (Author), Vishakha Sonawale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Raghoji ani Loot Suratechi
"शाईस्तेखानाने स्वारी करून स्वराज्याची लुट करुन अतोनात नुकसान केले. त्याची भरपाई आवश्यक होती आणि ती औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरतेची लुट करूनच होणार होती! त्याआधी सुरतेची वित्तंबातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी निवड केली बहिर्जीचा चेला राघोजी आणि काही जांबाज गुप्तहेरांची आणि सुरु झाला एक चित्तथरारक रहस्यमय प्रवास! राघोजीने सुरतमध्ये कसा प्रवेश केला? जीवावरचे धोके पत्करून कशी गुप्त माहिती काढली? त्याच्या साथीदारांनी काय पराक्रम गाजवले? परदेशी वखारींची कशी वासलात लावली? सुरतच्या सुभेदार इनायतखानाचे असे नेमके काय रहस्य होते? राघोजीला सुरतमध्ये अनपेक्षित सहकार्य करणारे नेमके कोण होते? त्यांच्यात कोणी गद्दार होता काय? उदात्त हेतूसाठी जगातील सर्वात मोठ्या योजनाबद्ध स्वारी आणि शिस्तीत केल्या गेलेल्या लुटीची चित्तथरारक, बुद्धीमान डावपेच आणि अंगावर रोमांच उभे करणारी, गुंतागुंतीच्या रहस्यांनी भरलेली जबरदस्त शिवकालीन हेरकथा."
Sanjay Sonawani (Author), Vinod Kulkarni (Narrator)
Audiobook
"Descriptionरामराज्याची भुरळ आजही कमी झालेली नाही. पण होते कसे ही रामराज्य? प्रजा नेमकी कसे जगत होती? त्यांच्या जीवनसंघर्षाची तीव्रता काय होती? त्यांची नितीमुल्ये, जीवनधारणा आणि स्वप्ने नेमकी काय होती? राम जगातील आदर्श राजा मानला जावा असे काय वेगळे होत होते रामराज्यात? इंद्रालाही आपले पद जाईल अशी धास्ती का वाटली? राम अयोध्येला येणार त्या दिवशी सकाळपासून ते राम प्रत्यक्षात अयोध्येला पोहोचेपर्यंतच्या काळात रामराज्यातील अयोध्येत राहणारी ते वस्त्या-गावात राहणा-या निवडक व्यक्तींच्या आयुष्यात काय घटना घडल्या आणि त्यांची नैतिक दृष्टी काय होती याचे हृदयंगम दर्शन घडवणा-या या कथा रामराज्याचे महनीय आणि उदात्त रूप वाचकांसमोर ठेवत स्वप्न देते कि आजही तसेच राज्य असले पाहिजे...रामराज्य! संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या कथा ऐका यशश्री यांच्या हृदयाला भिडणा-या आवाजात!"
Sanjay Sonawani (Author), Yashashree (Narrator)
Audiobook
[Marathi] - Avela Aani Abhadra Dreka
"आवेला आणि द्रेका जंबू ग्रहावरील इला देश हा स्त्रीराज्य असलेला एक अद्भुत देश. येथील अंगात अद्भुत शक्ती असलेल्या स्त्रिया पुरुषांना फक्त भोग्य वस्तू मानतात...पुरुषांना त्यांनी गुलाम केलेले आहे. आवेला ही अशीच मनसोक्त कामोपभोग घेणारी सुंदरी. पण तिला अचानक आपल्या भवताली काही गूढ रहस्यमय घडत असल्याचा संशय येतो. इला देवीच्या पूजेसाठी आयोजित केलेल्या सायोंत्सवात भाग घ्यायला जाते आणि एक भीषण रहस्य उलगडू लागले...महाभयंकर द्रेका जंबू ग्रहावर आपली काळी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तेथे आला होता. एक भयचकित करणारा भयंकर संघर्ष सुरु झाला. आवेलाचे काय झाले? द्रेका जिंकला कि इलादेवीची सार्वभौम सत्ता? संजय सोनवणी यांनी लिहिलेली आणि परी तेलंग यांनी अभिवाचन केलेली ही जंबू ग्रहावरच्या अद्भुत विश्वात नेणारी एक कामोत्सुक कथा!"
Sanjay Sonawani (Author), Pari Telang (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sameer Chakravarty ani Tibetcha Khajina
"चीनी तिबेटमध्ये जाऊन लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेच्या सूत्रधारालाच ठार मारण्याची अत्यंत धाडसी कामगिरी समीर चक्रवर्तीवर आली खरी पण या वेळेस सारे काही सोपे नव्हते. तिबेटच्या भयाण थंडीत आणि दुर्गम प्रदेशातून चीनी लष्करापासून जीव वाचवत दूर पळत असताना समीर अनपेक्षितपणे एका वेगळ्याच गूढ आणि रहस्यमय प्राचीन खजिन्याच्या जीवघेण्या शोधात सापडला. कोणाचा होता हा खजिना? त्याचा भारताशी काय संबंध होता? कोण होता जोरावरसिंग? तो खजिना शोधण्यात समीरला यश आले का? ले. जन. वांग कैला ठार मारण्याची त्याची धाडसी योजना यशस्वी झाली का? आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याचे पुढे काय झाले? या आणि अशाच अनेक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐकलीच पाहिजे अशी विलक्षण धाडसकथा! भारताचा लाडका सुपर हिरो समीर चक्रवर्ती याची संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीवरील साहसकथा तुम्हाला रहस्य आणि थराराच्या जाळ्यात अलगद घेऊन जाईल."
Sanjay Sonawani (Author), Sanket Mhatre (Narrator)
Audiobook
[Marathi] - Torman ani Daivi Talvar
"हुणांचा सर्वशक्तीमान राजा तोरमान राजपुत्र मिहीरकुलसह भारतावर चालून आला तो त्याला जगाचा सम्राट बनवू शकेल अशा दैवी तलवारीच्या शोधात. त्या तलवारीच्या शोधात त्याने अपार विध्वंस माजवले. गुप्त सम्राट भानुगुप्त त्याला रोखण्यासाठी सर्वशक्तीनिशी उभा राहिला. काय होते त्या तलवारीचे रहस्य? हुणांना ती तलवार मिळाली काय? ऐकलीच पाहिजे अशी ऐतिहासिक थरारकथा!"
Sanjay Sonawani (Author), Aniruddha Dadke (Narrator)
Audiobook
[Marathi] - Soterche Praveshdwar
"सोतेरनेच एके काळी जंबू ग्रहावर आलेले भयंकर संकट आपल्या महापराक्रमाने हटवून जीवसृष्टीला मुक्त केले होते.कोणालाही माहित नव्हते कि सोतेरने कुबड्या मिलोसोला नेमके कोठे गाडले ?दोर्खुनांसारख्या महाबलाढ्य जीवांवर राज्य करण्याचे स्वप्न बोलेवाचे पूर्ण झाले का? केशी भिदारांच्या राज्यात जाण्याचा निर्णय मिकाने का घेतला आणि कुणाच्या सांगण्यावरून? मिकाने जंबू ग्रह कसा वाचवला ? हि उत्कंठावर्धक कहाणी आजच ऐका! संजय सोनवणी लिखित - सोतेरचे प्रवेशद्वार, मंगेश सातपुते यांच्या आवाजात ,स्टोरीटेलवर ."
Sanjay Sonawani (Author), Mangesh Satpute (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sheptichya Taryache Bhavishya
"ट्रेकोलाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते कि कासी कधी आपली जीवन संगिनी बनेल पण तरी ती त्याच्या आयुष्यात आली . ती येण्यामागे नियतीचा काही हेतू होता का? काय होते ट्रेकोला आणि कासीचे भविष्य ? त्रिकोलाची भविष्यवाणी खरी ठरली का ?काय होता त्यांच्या बाळाचा आणि शेपटीच्या ताऱ्याचे रहस्य ? हे जाणून घ्यायचे असेल तर आजच ऐका ! शेपटीच्या ताऱ्याचे भविष्य. संचित वर्तक याच्या आवाजात , स्टोरीटेलवर."
Sanjay Sonawani (Author), Sanchit Wartak (Narrator)
Audiobook
"विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. 'चेटके...ती मस्तके आणि दिव्य...' केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , 'मातेलीचा सूड' स्टोरीटेलवर."
Sanjay Sonawani (Author), Pari Telang (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community