Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Vishakha Sonawale
Browse audiobooks narrated by Vishakha Sonawale, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"शिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते.
शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते.
भविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला पाहिजे, यावरचे चिंतन या पुस्तकात आले आहे.
प्रत्येकाने वाचावे आणि बोध घ्यावा असे हे क्रांतिकारी पुस्तक !"
"शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते.
संभाजी महाराज शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. अपयशी अकबर शेवटी महाराष्ट्रात येतो. संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.
आपल्याच पुत्राला फितवले म्हणून चवताळलेला औरंगजेब संभाजीमहाराजांच्या नाशासाठी महाराष्ट्राची वाट धरतो. त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याला कैद करून ठार मारण्याचाही बेत संभाजी महाराज आखतात, पण इकडे रायगडावर खुद्द संभाजी महाराजांच्याच हत्येचा कट शिजलेला असतो. अकबरामुळे तो कट उघडकीला येतो आणि दोषी मंत्री आणि त्यांच्या साथीदारांना हत्तीच्या पायी तुडवून मारले जाते.
सत्ताभिलाषा, त्यासाठी केली आणि घडवली जाणारी क्रूर नाट्ये एकीकडे तर मानवी स्नेहबंध टिकवण्यासाठी किंवा स्वप्नांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेली किंवा होणारी भावनाट्ये दुसरीकडे यांच्या संमिश्र खेळातून मानवी प्रेरणा नेमक्या कशा वर्तन करतात याचा शोध घेत ही कादंबरी साकार होते."