Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Sanchit Wartak
Browse audiobooks narrated by Sanchit Wartak, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी गायब झालेले गूढ मंत्रांचे एक बाड शोधत शेवटी पोचला देमीन रहात असलेल्या अरुंद दरीतील वस्तीत. तेथून सुरु झाले भयंकर उत्पात. अद्भुताने भरलेले रहस्यमय धाडसी पाठलाग. आपल्यातही अचाट अद्भुत शक्ती आहेत ही देमीनला जाणीव झाली ती त्या शक्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर. द्रेकाच्या काळ्या विश्वात शिरून देमीन विजय प्राप्त करू शकला का? आपल्या ग्रहाला काळ्या शक्तीच्या तावडीतून मुक्त करू शकला का?
क्षणोक्षणी अद्भुताच्या पसाऱ्यात खेचत नेणारी आणि एकाहून एक विलक्षण पात्रे असलेली संजय सोनवणी लिखित कादंबरी ऐका संचित वर्तक यांच्या आवाजात!"
"ट्रेकोलाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते कि कासी कधी आपली जीवन संगिनी बनेल पण तरी ती त्याच्या आयुष्यात आली . ती येण्यामागे नियतीचा काही हेतू होता का? काय होते ट्रेकोला आणि कासीचे भविष्य ? त्रिकोलाची भविष्यवाणी खरी ठरली का ?काय होता त्यांच्या बाळाचा आणि शेपटीच्या ताऱ्याचे रहस्य ? हे जाणून घ्यायचे असेल तर आजच ऐका ! शेपटीच्या ताऱ्याचे भविष्य. संचित वर्तक याच्या आवाजात , स्टोरीटेलवर."
"फ्रेंच कादंबरीकार ज्यूल व्हर्न ने १८७९ साली क्षेपणास्त्रांची कल्पना केली होती. दि बेगम्स फॉर्च्यून या नावाने प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा भा.रा.भागवतांनी केलेला तितकाच रंजक अनुवाद."
"भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'झपाटलेले प्रवासी', फिलियस फॉग या झपाटलेल्या प्रवाशाने पैज लावून केलेल्या या जगप्रवासाची अद्भूत कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते."
"ही कथा अंत्येष्टिविधीकरणाऱ्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची. एका दुर्गम खेडय़ात राहणारा 'दत्तू पुजारी' हा या कांदबरीचा नायक आहे. तो धार्मिक कार्यही करतो आणि अंत्यसंस्कारही करतो. दोन्ही विधी करत असल्यामुळे त्याला गावक-यांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद या कांदबरीत टिपण्यात आले आहेत. ५० वर्षापूर्वीपासून आजवरचा कालखंड कादंबरीत चित्रित केला आहे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी आणि अभिव्यक्त केलं आहे 'संचित वर्तक ' यांच्या आवाजात ."
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here