Save on books. Give 25% back to schools. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Prabhakar Vartak
Browse audiobooks narrated by Prabhakar Vartak, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
2 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
"स्टीव्ह जॉब्ज हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं. ते एका जादूगाराचं प्रतीक होतं. प्रतिभा, इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात, याचं ते जितंजागतं उदाहरण होतं. आज विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख असलेली अशी एकही व्यक्ती नसेल जिनं स्टीव्ह जॉब्ज हे नाव ऐकलं नसेल. मोबाईल, संगणक आणि गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल. तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्ज यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत असत. केवळ जगातले सर्वात शानदार संगणक बनवले नाहीत, तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला. हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर जॉब्ज यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं."
"कुशाग्र बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेला आणि गणिताची विलक्षण आवड असलेला एक विद्यार्थी-संशोधक-
प्रकांड पंडित ते मंडालेच्या काळ्या पाण्यात उद्याच्या स्वतंत्र भारताची स्वप्नं पाहणारा कर्मयोगी अशा
लोकमान्यांच्या जीवनप्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वातील वेगवेगळ्या
पैलूंचा आढावा या लेखात घेण्यात आलाय."