"'पहिले प्रेम हेच खरे प्रेम असते ही गोष्ट साफ खोटी आहे'
हेच वि. स. खांडेकर यांनी उदाहरण देऊन पटवून दिले आहे. पहिले प्रेम हे कधीही अंतिम सत्य नसते कधी कधी पुन्हा झालेले प्रेमही पहिल्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असू शकते."
"कुटुंबाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या कुटुंबप्रमुखाची करूण कथा ' मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास हि या संगमातील पहिली नदी. कुटूंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.' व्यतिगत ऋण, कुटूंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिवीर विचार वि. स. खांडेकरांनी ' सुखाचा शोध ' या कादंबरी मांडले आहेत."
"प्रीती हि वेलीसारखीच आहे. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! तर सार्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...प्रेमाचा अर्थ किती सुक्ष्म होता आणि ते किती मोठा असू शकतो ...याची प्रचिती येणारी वि. स. खांडेकर लिखित मराठी कादंबरी -अमृतवेल , सागर कदम यांच्या आवाजात."
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here