Browse audiobooks narrated by Sagar Kadam, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा."
Nitin Thorat (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे कसे राजगडी पोहचले ते जरूर ऐका."
Nitin Thorat (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"* केदारनाथ १७ जून * तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थ ने सररकण आपली नजर वळवली ....त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होत त्याचं ही त्याला भान न्हवत मुलगा ही त्या हाडाच्या सांगाड्या कडे पाहत असावा सिद्धार्थ गुडग्यावर बसला दोन्ही हातांनी त्यांचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला ,'भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला . त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला ,'घाबरू नकोस ....जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत म्हणूनच आपण मरायचं नाही...' 'आपल्याला जिवंत रहावंच लागेल !' एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी .... *केदारनाथ १७ जून"
Dr Prakash Koyade (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
[Marathi] - Incarnations -India In 50 Lives
"या पुस्तकात जगातील स मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज4 या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्"
Sunil Khilnani (Author), Madhavi Ganpule, Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"गावातील प्रतिष्ठित आणि लबाड व्यक्तीला एक स्त्री कशी धडा शिकवते? याचं वर्णन म्हणजे 'अभिलाषा'"
Nirmala Deshpande (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"प्रीती हि वेलीसारखीच आहे. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! तर सार्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...प्रेमाचा अर्थ किती सुक्ष्म होता आणि ते किती मोठा असू शकतो ...याची प्रचिती येणारी वि. स. खांडेकर लिखित मराठी कादंबरी -अमृतवेल , सागर कदम यांच्या आवाजात."
V.S. Khandekar (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"नवऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीची कथा"
Manik Gunvardhini (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"आर्थिक विवंचनेच्या वादात सापडलेलं प्रेम म्हणजे 'जुई '"
Yashvant Karnik (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
[Marathi] - Aut ghatkecha Rajya
"मेनका अंकातील शृगांरिक कथा ' औट घटकेचं राज्य'"
Prabhakar Joshi (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
"उफाड्या बांध्याच्या सगुणेच्या पोरीला बघून त्याची नजर चाळवते. तो सगुणेला रेणुकेत शोधू पाहतो. तेव्हा त्याची ती नजरनजर यशश्वी होते का?"
Sharad Satam (Author), Sagar Kadam (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community