"कसलेच कारण नसताना गावातील प्रतिष्ठित कुटूंबातील व्यक्तीचा खून होतो आणि गुन्हेगार कसलाच थांगपत्ता लावू देत नाही. पोलिसांची तपासाची चक्र वेगाने फिरू लागतात आणि समोर येते ती एकदम धक्कादायक माहिती……."
"एका तरूण मुला-मूलीचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत सापडल्यावर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. त्यात त्यांचे एकमेकांवर आधी प्रेम होते हे उलगडल्यावर पोलिस तपासाची चक्र वेगात सुरू झाली. दोघेही वेगळ्या जातींचे असल्यामुळे त्याला राजकीय रंगही मिळाला आणि पोलिसांवरचा दबाव अजूनच वाढला. नक्की कोणी केला होता खून? ही आणखी एक आॅनर किलींगची घटना तर नव्हती?"