Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Yashpal Sarnath
Browse audiobooks narrated by Yashpal Sarnath, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"सायरस पूनावाला - सिरम इन्स्टिट्यूट हे लसनिर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. कोट्यवधी लशींची निर्मिती करण्याची क्षमता, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत केलेलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि जगात सर्वात कमी किमतीत रुग्णापर्यंत लस पोचवण्याचं मिशन ही सिरम इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्यं. या सगळ्या व्यापामागे, दूरदृष्टीमागे जे नाव आहे ते म्हणजे सायरस पूनावाला."
"भांडण मिटलं असलं तरी दोघांना एकमेकांची नावं घेताना अवघडल्यासारखं वाटत होतं. आता त्यावर उपाय म्हणून दोघे मुद्दामून एकमेकांना नावाने हाक मारायचं ठरवतात, आणि त्यातून काही मजा घडतात."
"पुण्यात नोकरी शोधून वैतागलेला अक्षय डेटिंग ऍप्सवर मुली शोधत बसला आहे. आपल्याला हा डेटिंग ऍप प्रकार कधीच जमणार नाही असं वाटून तो ऍप डिलीट करत असतानाच काहीतरी घडतं.
डेटिंग ऍपवर भेटलेल्या मुलीच्या त्या वागण्याने पायाखालची जमीन सरकलेला अक्षय आता तिच्यासमोर अगदी गयावया करायला लागतो, एवढ्यात त्याला काही सुचतं."
"मंजिरी आणि अक्षय खूप बोलतात. एकमेकांशी बोलताना त्यांना आपल्यात खूप गोष्टी एकसारख्या आहेत हे जाणवतं. शेवटी मंजिरी अक्षयला अगदी अनपेक्षित प्रश्न विचारते."
"मंजिरीने अनब्लॉक केलं यावर अक्षयचा विश्वास बसत नाही. बोलणं होत नसलं तरी तिने अनब्लॉक केलं याबद्दल त्याला भारी वाटतं. जॉब मिळाल्याचा आत्मविश्वास आता त्याच्या वागण्या बोलण्यात दिसतोय. महेशला घेऊन तो बिअर प्यायला जातो."
"मंजिरी आणि अक्षय आता दिवस दिवसभर बोलायला लागतात. दिवसभरातल्या लहानसहान गोष्टी एकमेकांशी शेअर करता करता ते जवळ येत जातात. पण महेश अक्षयला काही भलताच सल्ला देतो आणि अक्षय काही भलतं करून बसतो."
"अगदी फिल्मी वाटावा असा हा घडलेला प्रसंग अक्षयला खराच वाटत नाही. मंजिरी आणि आपण एकाच ऑफिसमध्ये? ऑफिसच्या ट्रेनिंग हॉलमध्ये दोघे एकत्र आहेत, पण ते खूप अवघडले आहेत."
"मंजिरीच्या अनोळखी वागण्याचा अक्षयला आता राग येतोय. त्याच्या मनात हळूहळू मंजिरीबद्दल द्वेष भरला जातोय. ती इतकं अति का करतेय हे त्याला समजत नाही. माधुरी आणि विवेकला या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय हे उमजत नाही."
"मंजिरी आणि अक्षयमधलं अवघडलेपण कमी झालंय. अक्षयचे शहरातल्या मुलींबद्दलचे गैरसमज माधुरीमुळे दूर होत आहेत. चौघे बारमध्ये जातात. मंजिरी आणि अक्षय चोरून एकमेकांना बघत आहेत.
मंजिरी आपल्या बोलण्याने दुखावली गेली असं अक्षयला वाटतं. महेशही तेच बोलतो. अक्षय मंजिरीला सॉरी म्हणतो. विवेकच्या घरी दोघे त्याला मदत करतात. दोघांना आपल्यामध्ये काही नातं तयार होतंय असं वाटतं.
गाडीवरून परत जाताना अक्षय आणि मंजिरीमध्ये बोलणं होतं. दोघांनाही आपण फक्त मेसेजवर जे थोड्या काळासाठी अनुभवलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतोय असं वाटतं."
"मंजिरीच्या आसपास रहायचं, पण तिला ओळखत नाही असं दाखवायचं याचा अक्षयला वैताग आला आहे. मंजिरीही त्याच्याकडं काहीसं अवघडल्यासारखंच बघते आहे. विवेक आणि माधुरीसोबत त्याची नुकतीच ओळख झाली आहे, पण हे सगळं त्याच्यासाठी खूप नवीन आहे."