"कथा- हॅक , लेखक - डॉ. केदार आठवले, महाराष्ट्रात पहिला आणि भारतात नववा येऊन सुनंदनने आय आय टी कॉम्पुटर शाखेत प्रवेश मिळवला . पण तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अवघे दोन महिने अगोदर केलेल्या हॅकर्सच्या परीक्षेत टॉप केल्याने त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली आणि त्याचा संबंध रॉशी कसा जोडला गेला याची रोमहर्षक कहाणी ऐका -स्टोरीटेलवर. माहेर दिवाळी २०२० अंकातील , हॅक या कथेत - ,कृणाल आळवे यांच्या आवाजात."
"कथा- तुज शोधाया मी गेले , लेखक - शिरीन म्हाडेश्वर
, जे जे तुमचं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ते कधीना कधी एक दिवस हरवणारच, पण नेहमी विश्वास ठेवायचा कि ते कोणत्याना कोणत्यातरी रूपात आपल्याजवळ परत येतच. . म्हणूनच रजतच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी रेवाने त्या दोघांचा एम्ब्रियो इम्प्लांट करून रजतचं बाळ पोटात वाढवण्याचा शेवटी निर्णय घेतलाच. , माहेर दिवाळी २०२०अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, तुज शोधाया मी गेले,ऐका -दर्शन बांगे यांच्या आवाजात."
"कथा- अपघात , लेखक - संदीप सरवते, कधी कधी काही चुका माणसाच्या आयुष्यात अपघातानेच होतात. पण त्या चुकांना , अपघातांना सत्याची झालर असेल तर त्या चुका देखील पदरात घेतल्या जातात. , माहेर दिवाळी २०२०दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, अपघात - ऐका , कृणाल आळवे, यांच्या आवाजात."
"कथा- संचित चिंता, लेखक - दीपक ठाकरे, माणसाचं आयुष्य कसं आणि कधी पालटेल ? याचा कधी नेमच नसतो. कालच्या चिटणीसला आणि आजच्या चिटणिसाला जर कुणी बघितले असते तर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसला नसता. माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, संचित चिंता -ऐका, रोहित हळदीकर ,यांच्या आवाजात."
"कथा- उन्माद आणि आवाज , लेखक -आदुबाळ , तिच्या तारुण्य सुलभ ध्येयवादी देहबोलीतून तिची क्रांतीवरची श्रद्धा स्पष्ट दिसत होती. जणू तिच्या स्वप्नातले जग तिच्या सळसळत्या रक्तातून उभे राहणार होते. पण एका बुलेटने तिच्या छातीच्या चिंधड्या केल्या आणि तत्वांसाठी तिने विरांगनेच मरण पत्करलं होतं . , माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, उन्माद आणि आवाज - ऐका, प्रसाद फणसे यांच्या आवाजात."