Browse audiobooks narrated by Krunal Alve, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Detective Alpha ani Kagdi Pakshyanche Gupit
"उज्ज्वल मोहपात्रा - दक्षिण मुंबईतील आमदार दिलीप ससाणे यांच्या पक्षाचा ट्रेझरर. दादरमधील एका प्रशस्त बंगल्यात तो एकटाच राहतो. एके दिवशी सकाळी मोहपात्राच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास येतं, की तो त्याच्या घरातून अचानक नाहीसा झाला आहे. बंगल्यातील अस्ताव्यस्त सामान आणि फरशीवरील आणि रक्ताचे ओघळ यावरून कोणीतरी राजकीय शत्रुत्वातून मोहपात्रावर हल्ला केला आणि त्याला उचलून नेलं, असा पोलीस निष्कर्ष काढतात. पण प्रकरणाला चमत्कारिक वळण तेव्हा लागतं, जेव्हा त्याच दिवशी सकाळी मोहपात्राच्या नावाने आलेलं एक निनावी टपाल पोलिसांच्या हाती पडतं. त्यात असतो कागदाने बनवलेला एक पक्षी ! पुढच्या तपासात पोलिसांना मोहपात्राच्या घरात असेच आणखी कागदी पक्षी सापडतात. या पक्ष्यांचा मोहपात्राच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का? ते पक्षी मोहपात्राला कोण आणि का पाठवत होतं? त्यांच्यात कोणता अनाकलनीय असा अर्थ दडला आहे? जेव्हा अल्फा या प्रकरणाचा तपास सुरू करतो, तेव्हा वरवर साध्या दिसणाऱ्या या प्रकरणाचं जीवघेण्या साहसात रूपांतर होतं! ऐका कृणाल आळवेच्या रंगतदार आवाजात."
Sourabh Wagale (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Detective Alpha ani Amar Akbar Anthony Koda
"फिरोदिया इंडस्ट्रीजचे मालक श्री. रजत फिरोदिया यांच्या पी.ए.चा बांद्र्यातील त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये रात्रीच्या वेळी खून झाला आहे. किचनमधील जेवण आणि डायनिंग टेबलवरील प्लेट्स यावरून कोणीतरी रात्री त्याच्याकडे जेवायला आलं होतं, हे स्पष्ट होतंय. पण सोसायटीच्या वॉचमनने किंवा शेजारच्या फ्लॅटधारकांनी कुणालाच तिथे आलेलं पाहिलं नाही. त्या रात्री तिथे घडलेल्या घटना म्हणजे एक रहस्यच आहे. मुंबईत दुसरीकडे एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला सेकंड हँड खरेदीत एक स्टडी टेबल मिळालंय, ज्याच्या खालच्या बाजूला एक गूढ मजकूर लिहिलेला आहे- 'अमर-अकबर-अँथनी यांच्या पापांचा घडा भरला. आता त्यांना मरावं लागेल.' त्या टेबलाचा मालक अज्ञात आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? बांद्र्यात झालेला खून म्हणजे याच मालिकेतला 'अमर'चा खून होता का? आणि तसं असेल, तर गुन्हेगाराच्या लिस्टवर पुढचे दोघंजण कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना अल्फाच्या बुद्धीचा कस लागणार आहे!!"
Sourabh Wagale (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Detective Alpha ani Morewadi Estate Madhil Rahasya
"'मोरेवाडी इस्टेट' म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला मोरेवाडी या खेडेगावाजवळील गोविंदराव मोरे या धनाढ्य सावकाराची दूरवर पसरलेली प्रॉपर्टी. या एकशेवीस एकर एवढ्या प्रचंड जागेत पसरलेल्या इस्टेटीत बंगला, गेस्टहाऊस, कित्येक लहानसहान घरं, बगिचे, फळबागा आणि बरंच काही आहे. या इस्टेटीवर आणि मोरेवाडी गावावर गोविंदराव मोरेंचं पिढीजात वर्चस्व आहे. अशा या मोरेवाडी इस्टेटीत झालेला खुनाचा सनसनाटी प्रयत्न आणि इस्टेटीतच दबा धरून बसलेला अज्ञात गुन्हेगार यांचा पर्दाफाश करण्यासाठी डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांना पाचारण करण्यात आलंय. या सगळ्याचा शोध घेत असताना अनेक रहस्यमय घटनांची मालिका तिथे घडत जाते आणि मोरेवाडी इस्टेटीचं गूढ आणखीनच गडद होत जातं."
Sourabh Wagale (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Detective Alpha ani Mrutyuche Sandesh
"सांगली शहरातील तळ्यापाशी एका वेड्याचा मृतदेह मिळाल्याची बातमी एके सकाळी पेपरात छापून आली. तो वेडा आदल्याच दिवशी वेड्यांच्या इस्पितळातून पळून गेला होता. पोलीस तो मृत्यू म्हणजे एक वेडाच्या भरात केलेली आत्महत्या म्हणून सोडून द्यायच्या विचारात आहेत. पण दुसरीकडे अल्फाला तो एक खून असल्याचे पुरावे मिळतात आणि तो त्या वेड्याच्या मृत्यूचा तपास सुरू करतो. जसाजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकतो, तसतसे त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे खून व्हायला लागतात. सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे खुनी प्रत्येक मृतदेहाजवळ एक तीन अक्षरी संकेत सोडतो, ज्यामुळे या मृत्यूंचं रहस्य आणखीच वाढतं. हे सगळं कोण घडवून आणतंय? तळ्याजवळ मेलेल्या वेड्याला काहीतरी गुपित ठाऊक होतं, हे नक्की. ते गुपित झाकण्यासाठीच ही खुनांची साखळी सुरू झाली होती. पण ते गुपित काय होतं? हा सगळा एखाद्या भयंकर कटाचा भाग आहे का? आणि त्या तीनअक्षरी संदेशाचं रहस्य काय आहे?"
Sourabh Wagale (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Mission Golden Cats
"मुंबईचा एक तरुण मुष्टियोद्धा अश्रफ अचानक बेपत्ता होतो. त्याला शोधून काढण्याची जबाबदारी त्याचा भाऊ रौफ घेतो. पण अश्रफ कोठे गेला? कुणासोबत गेला? का गेला? तो कोणत्या संकटात सापडला आहे? अश्रफला हुडकून काढणे आणि परत आणणे हे काम अजिबात सोपे नाही. तथापि या अशक्यप्राय कामात त्याला हिंदरक्षक नावाच्या देशभक्त संघटनेची मदत मिळते. ही संघटना लढाऊ आहे; शस्त्रसज्ज आहे; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशहितासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे. संघटनेची लेफ्टनंट कमांडर रुख्सार खान हिच्या मनात रौफबद्दल एक हळुवार भावना आहे. रौफला त्याच्या उद्दिष्टात सफलता मिळवून देण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पण अश्रफला परत आणणे त्यांना जमेल का?"
Ravindra Bhaiwal (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vikasacha Kalpavriksha
"कल्पवृक्ष हि संकल्पना आपण पुराणकथा , जातकथा किंवा कविता यातून ऐकत आणि वाचत आलो आहोत. प्रत्यक्षात असा कल्पवृक्ष अस्तित्वात आहे का ? सुधीर मनगुंटीवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कर्तृत्व हे लेखकाला कल्पवृक्षासारखंच भासतं . गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता, ना वय , ना अपेक्षांचं ओझं न बाळगणारा, कल्पनांचा वेध घेत वास्तवाचा आकार देणारा , भूमीशी घट्ट नाते असलेला अन देण्यासाठी सतत उत्सुक असलेला विकासाचा एक कल्पवृक्ष ! सुधीर मनगुंटीवार. ऐका ! स्टोरीटेलवर , कृणाल आळवे यांच्या आवाजात."
Kishor Kulkarni (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
"आम्रपाली नावाची प्रसिद्ध नर्तिका 'शो' करायला जात असताना 'होल्ड अप' केली जाते... 'होल्ड अप' करणारा माणूस तिला फक्त एके ठिकाणी सोडायला सांगतो. ती सोडते आणि विसरूनही जाते. पण त्यानंतर सुरु होतं एक रहस्य- नाट्य. ते आम्रपालीला फाशीपर्यंत पोचवणार का? नक्की काय घडले? या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एक माणूस देऊ शकेल. तो म्हणजे बॅ. अमर विश्वास!!! ऐका सुहास शिरवळकरलिखित सस्पेन्स थ्रिलर कादंबरी 'कायद्याचे हात' कृणाल आळवेसह..."
Suhas Shirvalkar (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Sacred Games Part 2
"सेक्रेड गेम्स - १ ऐकलीत? भन्नाट वाटली ना? पुढे काय होतंय याची उत्सुकता तुम्हाला असेलच. म्हणूनच तुमच्यासाठी पार्ट टू पण हजर आहे. ऐका विक्रम चंद्रालिखित जबरदस्त क्राईम थ्रिलर कादंबरी 'सेक्रेड गेम्स' भाग -२ कृणाल आळवेसह."
Vikram Chandra (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Sacred Games Part 1
"सेक्रेड गेम्सची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच 'सेक्रेड गेम्स' कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही सेक्रेड गेम्स पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. पाहिलेली नसली, लॅपटॉप, मोबाईलवर बिंज वॉच करायला वेळ नसला तरीही फिकर नॉट! आता ऑडियोसारख्या भन्नाट फॉर्ममध्ये अगदी ड्राईव्ह करतानाही ऐका सेक्रेड गेम्स! विक्रम चंद्रा यांची गाजलेली कादंबरी ऑडिओबुक रुपात, कृणाल आळवे यांच्या आवाजात."
Vikram Chandra (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Elon Musk: How the Billionaire CEO of SpaceX and Tesla is Shaping our Future
"एलॉन मस्क हा एक जगप्रसिद्ध, श्रीमंत आणि यशस्वी उद्योजक. 'टेस्ला'चं साम्राज्य उभं करणाऱ्या एलॉन मस्कची लाईफ स्टोरी नेमकी आहे तरी काय? ऐका, या ऑडिओबुकमधून. ही केवळ एलॉन मस्कचीच स्टोरी नाही, तर त्याच्या उद्योगातून तो जगाला काय देऊ पाहतोय, त्याचीही कहाणी आहे."
Ashley Vhans (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
"सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?"
Darshan Desale (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
[Marathi] - Praani Jeevangatha
"'प्राणी जीवनगाथा' या पुस्तकात निरंजन घाटे यांनी गांडूळ या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या सजीवापासून ते चिंपांझी या मानवाच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत , हे प्राणी जगतात कसे ? काय खातात ? स्वतःचा जोडीदार कसा मिळवतात ? अशी बारीकसारीक बरीच माहिती या पुस्तकात गोळा केली आहे."
Niranjan Sinhendra Ghate (Author), Krunal Alve (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer