Save on books. Give 25% back to schools. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Yashwantrao Chavan
Browse audiobooks narrated by Yashwantrao Chavan, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
3 audiobooks in our catalogue, every one with its narrator named.
"महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निवडक भाषणांचा हा पहिला अधिकृत संग्रह आहे. या संग्रहांत महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या काळांतील त्यांच्या भाषणांचा मुख्यतः समावेश केलेला असला तरी द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या कांहीं भाषणांचाहि त्यांत अन्तर्भाव करण्यांत आला आहे.
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पांच वर्षांच्या काळांत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधीं त्यांनी जे विचार प्रदर्शित केले ते वाचकांना एकत्रित वाचावयास मिळावेत या दृष्टीनेंच या संग्रहांतील भाषणांची निवड करण्यांत आली आहे.
पांच वर्षांचा काल हा राष्ट्राच्या, समाजाच्या किंवा व्यक्तीच्या जीवनातील फार मोठा कालखंड आहे असें नाहीं. परंतु इतिहासाची गति कालाच्या गतीनें नियंत्रित होत नसते. वर्षानुवर्षे संथपणानें चालणारा इतिहासाचा प्रवाह क्षणार्धात अशा कांही वेगानें उफाळून वाहूं लागतो कीं त्यामुळें व्यक्तींचे, समाजाचें आणि राष्ट्राचें जीवन आमूलाग्र बदलून जातें. गेल्या पांच वर्षांच्या काळांत महाराष्ट्राच्या जीवनांत असेच विलक्षण क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. अनेक दृष्टींनीं महाराष्ट्राच्या इतिहासांतील हा अनन्यसाधारण असा काळ आहे. या ऐतिहासिक काळांत श्री. यशवंतरावांनीं प्रदर्शित केलेल्या महत्त्वाच्या विचारांचें प्रतिबिंब या संग्रहांत शक्य तों दिसावें असा प्रयत्न करण्यांत आला आहे."
"भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका गरीब शेतक-याच्या घरात झाला होता. शिक्षणाची आवड, सततचा व्यासंग आणि बुध्दिमंतांच्या सान्निध्यातून मिळालेली वैचारिक समृध्दीचा वापर करून त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची कारकीर्द घडवली. ते एक सुसंस्कृत, संयमी, सौजन्यशील आणि भारद्स्त व्यक्तिमत्व होते. त्यांच्या भाषणांत यशवंतरावांच्या संसदपटुत्वाच्या अनेक छटा सापडतात. वादविवादात अनेक संदर्भ देत विरोधकांना नामोहरम करत. त्यांना आपल्या नर्म विनोदी शैलीने ते आपलेसं करत आणि आपला मुद्दा पटवून देत. जाती धर्म निरपेक्ष उदार मतवादी धोरणाचे पुरस्कर्ते असणा-या यशवंतरावांनी कृषि-औद्योगिक समाजाची कास धरली. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातला प्रोत्सहान दिले तसेच ग्रामीण भागात औद्योगिकता पोहचावी यासाठी धोरणे आखली. शेतक-यांच्या हिताचे अनेक कायदे आणले. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागाचा विकास आणि समाजवादी समाजरचना हे ध्येय ठेऊन तरुण नेतृत्व पुढे यावे यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या निवड़क भाषणात उमटते."
"मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…'
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो."