Browse audiobooks narrated by Harsshit Abhiraj, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Rahasyamay Egyptcha Shodh (Marathi Edition of A Search in Secret Egypt) by Paul Brunton
"Marathi Description 1930 च्या काळात, पॉल ब्रन्टन यांनी इजिप्तमधील गूढांचा आणि यातुविद्येचा जो अनुभव घेतला, तो “”रहस्यमय इजिप्तचा शोध (अ सर्च इन सिक्रेट इजिप्त)”” या पुस्तकात ग्रथित आहे. इजिप्तमधील गूढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्त्व यांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर ग्रेट पिरॅमिड या वास्तूच्या आत त्यांनी एकट्याने व्यतीत केलेली ज्ञानपूर्ण अनुभवाची आणि काहीशा भीतीची जी रात्र होती, तिचेही वर्णन या ग्रंथात आढळते. शरीर व मन यांना शक्य असलेल्या सर्वोच्च अशा बिंदूवर पोहोचायचा ब्रन्टन यांनी प्रयास केला. प्राचीन इजिप्तमधील मंदिरांमध्ये सुयोग्य अशा साधकांच्या बाबतीत जो दीक्षाविधी केला जाई, तो अतिशय नाट्यपूर्ण असे. त्या दीक्षाविधीच्या वेळी योगाचे विविध प्रकार आणि जादू वा यातुविद्या यांची सरमिसळ होत असे, त्यांना खर्या आध्यात्मिकतेपासून चिकित्सकपणे बाजूला काढून अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या माणसांशी त्यांची गाठ पडली. त्यात तांत्रिक होते, फकीर होते, दरवेश होते, आणि विद्वान व्यक्ती होत्या. त्यांनी सर्पविद्येत प्रावीण्य मिळविले. मुस्लीम नेत्यांशी त्यांनी जो मनमोकळा संवाद साधला, तो आजही कालोचित आहे. हज यात्रेचे त्यांनी जे वर्णन केले, त्यातून महंमदांच्या खर्या अनुयायांच्या श्रद्धेचे सौंदर्य आणि प्रेरणा सूचित होते. अंतिम टप्प्यात, ब्रन्टन यांनी स्वतःच्या आध्यात्मिक मार्गाकडे लक्ष वळविलेले दिसते. त्यांना जे अनुभव आले, त्यातून ते सांगतात की आपण आपल्या शरीरापलीकडे काही असतो आणि आत्म्याचे मुक्तपण इथे आणि आत्ता अनुभवता येऊ शकते. English Description In this book, philosopher Paul Brunton (1898-1981) encounters the mysteries and magic of Egypt in the 1930s, including an eerie yet illuminating night spent alone inside the Great Pyramid. Alongside his explorations of ancient Egypt's monuments and gods, Brunton encounters a variety of occultists, fakirs, and dervishes, and even manages to become initiated into the deadly art of snake charming..."
Paul Brunton (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Power of Habit (Marathi Edition) by Charles Duhigg: Apan Je Karto Te Ka Karto? Te Ka
"द पॉवर ऑफ हॅबिट - आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे न्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग, हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्या आश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात. काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण्यासाठी अनेक वर्षे का प्रयत्न करावे लागतात, का झगडावे लागते, तर त्याच वेळी काही मात्र, स्वतःमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणतात हे कसे याचा ते शोध या पुस्तकामध्ये घेतात. आपल्या सवयी कसे कार्य करतात आणि त्यांचा आपल्या मेंदूमध्ये नेमका कोठे उगम होतो याचा शोध घेण्यासाठी, मेंदू वैज्ञनिकांचे चाललेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी ते विविध प्रयोगशाळांना भेटी देतात आणि ऑलिंम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्फ, स्टार बक्सचे मुख्याधिकारी हॉवर्ड शुल्झ आणि नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या यशामध्ये सवयीचा वाटा किती महत्त्वाचा होता याचा ते रहस्यभेद करतात. त्या सर्वांचा परिपाक म्हणजे हे लक्षवेधी कथन आणि सशक्त शोध ः व्यायामामध्ये नियमित पण आणण्यासाठी, वजन घटवण्यासाठी हुशार मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी, कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करण्यासाठी, अद्वितीय आस्थापनांची उभारणी इत्यादी करण्यासाठी, सवयी काय व कशा उपयोगी पडू शकतात. याचे मर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या नव्याने विकसित झालेल्या शास्त्राचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायात, आपल्या समाजात आणि आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो. लालित्यपूर्ण सुबोधता असलेले, प्रभावी विचार प्रवर्तक, चौकस आणि उपयुक्त. – जिम कॉलिन्स बौद्धिक गांभिर्य आणि आपल्या वाईट सवयी सोडण्याचे मार्ग, याबद्दलचा व्यवहार्य सल्ला याचा संतुलित मेळ राखणारे, पहिल्या दर्जाचे पुस्तक. – द इकॉनॉमिस्ट अक्षरशः संमोहित करणारे. – द इकॉनॉमिस्ट Tags: Marathi audiobook, Bestseller audiobook, Habit power, Charles Duhigg, Behavioral change, Voluntary habits, Habit formation, Power of independent thought, Art of achieving dreams, Natural sensitivity, WOW Publishings"
Charles Duhigg (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
[Marathi] - MADHUR NATYNANKADE VATCHAL (MARATHI EDITION): EXPLORING NEW HORIZONS IN RELATIONSHIPS
"नात्यांत नवप्रकाशाचा उदय मानवाचं पृथ्वीवर येण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे नात्यांना योग्य प्रकारे निमित्त बनवून नवप्रकाश किरणांनी ती उजळून टाकणं होय. त्याचबरोबर विश्वासाच्या पुष्परूपी सुगंधाने नातेसंबंधांना ओतप्रोत भरून, ते टिकवण्यासाठी चिरस्थायी प्रेम कसं करावं, परिवाररूपी वृक्षांची तोड कशी थांबवावी? अहंकाराची आरी आणि कपटरूपी कुर्हाड नष्ट कशी करावी? नातेसंबंधाच्या आसक्तीतून मुक्त कसं राहावं? या सर्व गोष्टी आपण प्रस्तुत पुस्तकात जाणणार आहोत. पृथ्वीवर आपल्याला सदैव उत्साही, सजग आणि सतेज राहण्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्यातील भावना प्रकट व्हाव्यात यासाठी आपल्याला अनेक नातलग दिले असून ते आपल्या सभोवताली विशेष वातावरण तयार करत असतात. पण आपण त्यात आनंद मानतो का? यासाठी नियतीची ही सुंदर व्यवस्था जाणून नातेसंबंधात माधुर्य आणण्याचा प्रयत्न करायला हवा. नात्यांमध्ये परिपूर्णता आणून, दुरावा कसा नष्ट करता येईल याचं उत्तम सादरीकरण या पुस्तकात करण्यात आलंय. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मदत करेल, आत्मसमृद्ध परिवाराच्या निर्माणासाठी. हे निर्माणकार्य जेव्हा प्रत्यक्षात साकार होईल, तेव्हा मधुर नात्यांचं आनंदगाणं घराघरात, मनामनात क्षणोक्षणी झंकारेल. Tags: Relationships, Enthusiasm, Positive Environment, Sweetness, Perfection, Overcoming Obstacles, Self-sufficiency, Family, Moments of Joy, Construction of a Family, Cherishing Relationships, Building Strong Bonds, Emotional Well-being, Joyful Living, Sirshree, Tejgyan, Happy Thoughts"
Sirshree (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
[Marathi] - AALSAVAR MAAT (MARATHI EDITION): UTSAHI JIVNACHI SURUVAT
"सुस्तीपासून मुक्ती मिळवण्यात कधीच सुस्ती करू नका… माणसाच्या शरीरासाठी तमोगुण काही प्रमाणात आवश्यक आहेच, पण याचा अतिरेक मात्र त्याच्या अभिव्यक्तीसाठी अडथळा बनतो. आळस हा असा विकार आहे, जो माणसाच्या सर्व सद्गुणांना झाकोळून टाकतो. या विकाराच्या प्रभावात आल्यामुळं एक सर्वोत्तम कलाकार, रचनाकार किंवा कुठलीही यशस्वी व्यक्ती आयुष्यभर अपयशालाच बळी पडते. हे पुस्तक आहे तुमच्या अंतर्यामी दडलेल्या सर्वांत मोठ्या शत्रूविरुद्ध तुम्हाला चेतवण्यासाठी. या शत्रूला वेळीच ओळखून अंतर्यामी शोध घ्या आणि त्यातून मुक्त व्हा. या उच्च कार्यासाठी प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला मिळतील – 7 संकेत, 7 पावलं, 7 दिशा आणि 13 उपाय. प्रस्तुत पुस्तक “हत्यार’ आहे आळसरूपी शत्रूला कायमचं दूर पळवण्यासाठी. चला तर मग, सुस्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुस्ती न करता या पुस्तकाचा लाभ घेऊया… सुस्तीवर करूया मात, मग बघा कशी होईल उत्साही जीवनाची सुरुवात… # Tags - Laziness - Overcoming laziness - Inner motivation - Self-improvement - Personal development - Life improvement - Positive thinking - Actionable advice"
Sirshree (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
[Marathi] - SWASANWAD EK JADU (MARATHI EDITION): APLA REMOT CONTROL KASA PRAPT KARAWA
"कोणी आपली प्रशंसा केली आणि म्हटले, ‘तुम्ही होता म्हणून काम झाले नाहीतर हे काम होणे शक्यच नव्हते.’ अशाप्रकारे आपली स्तुती झाली तर काय होईल? अशा वेळी अनेकांना रात्रभर झोपा येत नाही. त्यांना ते प्रशंसनीय बोल वारंवार आठवतात. ‘कशी माझी प्रशंसा झाली, कसे सर्वजण मला चांगले म्हटले,’ हा मनातील स्वसंवाद थांबतच नाही. एखाद्याने जर आपली चूक दाखविली तर ते आपल्याला त्रासदायक ठरते. कोणी आपली निंदा केली तर आपल्याला वाईट वाटते. आपण स्वतःच आपला रिमोट इतरांच्या हाती देऊन त्यांच्याकडून ही अपेक्षा बाळगतो की, ‘त्यांनी रागाचे नव्हे तर प्रशंसेचे बटन दाबावे.’ पण काय झाले पाहिजे? आपला रिमोट कंट्रोल प्रत्येक क्षणी आपल्याच हाती असावा. सभोवतालचे वातावरण, घटना याचा आपल्याला त्रास होऊ नये, आपण नाराज होऊ नये, हेच या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. मुख्य लक्ष्य आहे."
Sirshree (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
[Marathi] - VICHAR NIYAM (MARATHI EDITION): THE POWER OF HAPPY THOUGHTS
"तिसरा चमत्कार समजण्यापूर्वी संपूर्ण ज्ञानाचे चार आयाम समजूया. पहिला आयाम - आसनायाम, दुसरा आयाम - प्राणायाम, तिसरा आयाम-विचारायाम, चौथा आयाम - मौनायाम. विचारांचा तिसरा आणि चौथा आयाम, जो विचारसूत्र आणि मौनमंत्राच्या रूपात या पुस्तकात प्रस्तुत केला आहे, त्याचा उपयोग करून आपण निर्मळ मन, प्रशिक्षित शरीर, उपजिविका लक्ष्य, आदर्श वजन, दीर्घायुष्य, चांगले मित्र, कलाकौशल्य, निरोगी जीवन, योग्य जीवनसाथी आणि पृथ्वीलक्ष्य प्राप्त करू शकता. आपला एक सशक्त विचारदेखील विश्वाला नवीन दिशा देऊ शकतो. काय म्हणता, ‘हे कठीण आहे.’ तर मग निश्चितच हे पुस्तक वाचणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचला असाल. आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्यासाठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्वास ठेवा. या विश्वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे. चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे... तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया... कुठे? महानंदाच्या साम्राज्यात...!"
Sirshree (Author), Harsshit Abhiraj (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer