Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Deepti Sidhaye
Browse audiobooks narrated by Deepti Sidhaye, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"तळघरातल्या एका अंधाऱ्या बेकरीत सव्वीसजण गुलामासारखे राबत असतात. बाहेरचा उजेड बघण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी क्वचितच येतं. एवढं करूनही दोन वेळच्या निकृष्ट जेवणापलीकडे त्यांना काही मिळत नाही. या सगळ्यात त्यांना आनंद देणारी एकच गोष्ट होती - शेजारच्या दुकानात काम करणारी एक गोड तरुण मुलगी रोज सकाळी काही मिनिटांसाठी त्यांच्या बागेला भेट देते. सर्वजण फक्त तेवढ्याच सुखाची दिवसभर वाट पाहत असतात. तेव्हा त्यांच्यात हास्य-विनोदही होतो. तेवढाच त्यांच्या कष्टमय जीवनात विरंगुळा, परंतु त्यालाही गालबोट लागतं. ती त्यांच्यापासून दुरावते… असं का घडतं? ऐकुया मॅक्झिम गॉर्कीची गोष्ट."
"देव कोणाला दिसला आहे? संतमहंत मोठ्या विश्वासानं सांगतात की 'आम्ही पाहिला'! हे अनुभव व्यक्तिगत असतात. अशाच एका देवदुतानं पृथ्वीला भेट दिली आणि उसळत्या समुद्रात प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना त्यानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून श्रद्धावान भक्तांनी त्याचं स्मारक उभारलं. कोण होता तो देवदूत? ऐका ओनोरे द बाल्झाकची कथा 'देवदुताची भेट' दीप्ती सिधये यांच्यासह."
"पाश्चिमात्य जगात हिवाळा अत्यंत कडाक्याचा असतो. श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांचं ठीक आहे, पण गरीबांचे हाल वर्णनापलीकडे असतात. असंच एक सर्वसाधारण मुलाबाळांनी भरलेलं आनंदी कुटुंब नववर्षाची सुरुवात सकाळच्या नाश्त्यानं करणार आहे. पण त्यांची आई कुठेतरी बाहेर गेलेली आहे. त्यावेळी एक स्त्री या आईच्या दृष्टीस पडते. ही स्त्री अत्यंत गरीब, नुकतीच बाळंतीण झालेली आणि आपल्या इतर मुलांसह काही दिवसांची उपाशी आहे, असं आईला कळतं. आई ही परिस्थिती बघून आपल्या घरी परतते आणि या स्त्रीला कशी मदत करते, त्याची ही कहाणी."
"अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, 'सौजन्याचा बळी' ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्यासह."
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here