"उच्च शिक्षण, तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करून पाहण्याची उर्मी, सतत नव्या उत्पादनांचा ध्यास आणि मायभूमीशी घट्ट जुळलेली नाळ या चारही गोष्टींचा संगम म्हणजे डॉ. रविंद्र कुलकर्णी या उद्योजगाचं व्यक्तिमत्व आहे. जातिवंत उद्योजकांची सगळी लक्षणं त्यांच्यात आहेत. म्हणून केवळ एकाच उत्पादनावर संतुष्ट न राहता ते नवनवीन उत्पादनं बनवत राहतात, अमेरिकेतलं सुखासीन आयुष्य सोडून भारतात नवी आव्हानं पेलायला सिद्ध होतात."
"स्वप्नील हा तरुण उद्योजक जुने कपडे दहा रुपये दराने विकत घेतो आणि त्यापासून विविध उत्पादने तयार करून विकतो. जुन्या कपड्यांपासून नवे कपडे आणि इतर वस्तू बनवण्याच्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल ऐका, यशस्वी उद्योजकच्या या भागात."
"चेतन केतकर यांचं नेमकं वर्णन करायचं तर 'काळापुढती दोन पावले' अशा शब्दांत करावं लागेल. गणेशमूर्तींचा म्हणजे परंपरेने चालत आलेला व्यवसाय ते करतात पण तो करताना सध्याच्या काळापुढे उभं असलेलं पर्यावरणहानीचं संकट ओळखून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवतात शिवाय त्याची ऑनलाईन विक्रीही! काळाशी सुसंगत उद्योजकता करणाऱ्या उद्योजकाची ही कहाणी!"
"महिलांमध्ये उद्योजकता उपजतच असते. काहींना ती सिद्ध करण्याची संधी मिळते, काहींना मिळत नाही. कुटूंब चालवण्यासाठी भाजी विकणं, मेस चालवणं, शिवणकाम करणं असे अनेक उद्योग हजारो महिला करतात. उपलब्ध उद्योगसंधींचा चांगला फायदा करून घेतात. अशाच हरहुन्नरी महिलांमधील उद्योजगता हेरून त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्याचं काम 'अन्नपूर्णा' या संस्थेच्या माध्यमातून मेधा सामंत गेली अनेक वर्ष करत आहेत. म्हणजे मेधाताई नेमकं काय करतात? ऐका मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितलेली 'अन्नपूर्णा'ची ही कहाणी."
"कॅड ही संगणकप्रणाली वापरून अनेक सॉफ्टवेअर्स बनवता येतात. प्रत्येक उद्योगाच्या गरजेप्रमाणे त्यांचं स्वरूप बदलतं. अनेक उद्योगांना अशी सॉफ्टवेअर्स तयार मिळाली तर बरीच मदत होते. हेच लक्षात घेऊन पुण्यात दोन मित्रांनी कॅडकॉम्पचा व्यवसाय सुरू केला. काय आहे हा आगळावेगळा व्यवसाय...जाणून घ्या या यशोगाथेतून. मिलिंद कुलकर्णी सांगत आहेत, 'कहाणी मैत्रीची यशस्वी उद्योजकतेची'"
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here