Browse audiobooks narrated by Deepti Dandekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Sapiens: A Brief History of Mankind - Yuval Noah Harari
"सेपियन्स या पुस्तकात युवाल नोआ हरारी ने इतिहासाचे चार भागात वर्णन केलं आहे. ख्रिस्तपुर्व ७०० मध्ये सेपियन्सी आपली कल्पनाशक्ती कशी विकसित केली. त्यानंतर लागलेला शेतीचा शोध, परमेश्वराचं आस्तित्व आणि धर्म, मानवजातीचं एकत्रिकरण, वैज्ञानिक क्रांतीनंतर काय घडलं याबद्दल भाष्य केलं आहे. तसंच भविष्याचा वेधही घेतला आहे. सेपियन्स म्हणजे मानवाने सा-या जगावर प्रभूत्व गाजवण्याचं कारण तो लवचिक आहे असे हरारी म्हणतो."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Emotional Intelligence - Daniel Goleman
"आपल्या अवतीभवती अशा अनेक व्यक्ती असतात की त्या खूप बुध्दिवान असतात पण त्यांना आयुष्यातील साधी आव्हानं स्वीकारणं कठीण जातं. बुध्दीमापनात (आय क्यू) मध्ये ते खूप जास्त गूण मिळवातात पण जीवनातल्या साध्या समस्यांनाही त्यांना तोंड देता येत नाही. व्यक्तिंचे यश व अपयश फक्त बुध्दिमत्तेवर नाही तर भावनिक घटकांवरही अवलंबून असते हे सांगणारे इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक डॅनियल कोलमन ने प्रकाशित केले आणि या विषयाला प्रचंड गती मिळाली. भावनिक बुध्दिमत्तेला आता सर्वच क्षेत्रात महत्व आलं."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - About Behaviourism - B. F. Skinner
"कोणतीही तत्वं आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी. असं स्किनरचं ठाम मत होतं. आपली सगळी वर्तवणूक आणि आपले विचार आपण बाह्य परिस्थितीमुळे कसे संस्कारित झालो आहोत यावर अवलंबून असते असं स्किनर म्हणे. आधुनिक विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे चांगला समाज तयार होणे शक्य आहे. असा समाज स्वतःच्या इच्छेने वाढत्या लोकसंख्येला आळा घालेल आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवणा-या गोष्टींवर निर्बंध घालेल असं स्किनर यांना आत्मविश्वासाने जाहीरपणे म्हटलं होतं."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rational Emotive Behaviour Therapy- Albert Ellis
"ग्रीसमध्ये इ.स.५० ते १३५ एपिक्टेटस नावाचा एक स्टॉईक (माणसानं तक्रार न करता वेदना सहन कराव्यात असं मानणारा ) तत्वज्ञ होऊन गेला. त्याने एक महत्वाची गोष्ट म्हणून ठेवली होती. ' माणसं कुठल्याही गोष्टींंमुळे अस्वस्थ होत नाहीत. तर त्या गोष्टींकडे ते कसे बघतात आणि त्याचा ते विचार करतात यामुळे ते अस्वस्थ होतात.' हे त्याचं वाक्य २००० वर्षांनंतर ' कॉग्निटिव्ह सायकोथेरपी' मध्ये खूप महत्वाचं ठरलं. अल्बर्ट एलिसवर एपिक्टेटसचेच विचार तो वेगळ्या शब्दांत मांडत होता. मानसोपचारात अविवेकी विचार बदलून त्यांना विवेकाने विचार केला तर त्याचा समस्यांकडे बघण्याची विचारांची पध्दत बदलते ही विवेकनिष्ठ मानसोपचार पध्दती आली. एलिसने वर्तमानावर आधारित रॅशनल इमोटिव्ह बिव्हेरियल थेरपी शोधली. जी सध्या जगभर अनेक मानसोपचार तज्ञ वापरतात."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Feminine Mystique - Betty Friedan
"जवळ जवळ १९५० सालापर्यंत अमेरिकेत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपारिकच होता. स्त्रीच्या आयुष्याची परिपूर्णता तिच्या चांगल्या गृहिणी होण्यात, एक आदर्श माता होण्यात आहे. असंच सगळ्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. या खोलवर रूजलेल्या विचारांना छेद देण्याचं काम बेट्टी फ्राईडमनच्या द फेमिनाईन मिस्टीक या पुस्तकानं केलं. बेट्टीचं पुस्तक प्रकाशित केल्यावर अनेक स्त्रिंयांनीच या पुस्तकाला विरोध सुरू केला. पण या पुस्तकानंतर अमेरिकेत स्त्री वादाची लाट उसळली."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - A Theory of Human Motivation - Abraham Maslow
"ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या दशकानंतर ह्युमॅनिस्ट सायकॉलजी या विषयाला चालना मिळाली आमि १९६७ साली मॅस्लो ला ह्युमॅनिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले गेले."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Satyache Prayog - Mahatma Gandhi
"महात्मा गांधींनी आपले सारे आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असं ठरवलं. सुरूवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर असं ठामपणे म्हटलं. त्यांच्या या आत्मकथेच अहिंसेचे तत्वज्ञान मांडलं. अहिंसेचे तत्व पाळण्याकरता प्रचंड मोठे धैर्य आणि श्रध्दा आवश्यक असल्याचे ते म्हणत असत. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा म्हणजे अतिशय ओघवती भाषा आणि एका व्यक्तीचं अतिशय प्रांजल आत्मकथन आहे."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Origin of Species - Charles Darwin
"पृथ्वी कशी निर्माण झाली आणि इथली प्राणीसृष्टी कशी तयार झाली याबद्दल मानवाच्या मनात कायमच कुतुहूल होते. १८ व्या शतकापर्यंत दैवी प्रभावाने पृथ्वीची निर्मिती झाली आणि दैवी कृपनेच आता दिसते ती प्राणीसृष्टी निर्माण झाली या मताचा प्रभाव सर्वात जास्त होता. परंतू चार्ल्स डार्वीनने शास्त्रीय निरिक्षणांवर आधारित The origin of species हे पुस्तक लिहून उत्क्रांतीची मांडणी केली आणि जगभर खळबळ उडाली. जगभरातील विचारधारेवर प्रभाव टाकणा-या उत्क्रांतीच्या तत्वाचा जनक म्हणून आजही डार्वीन आणि उत्क्रांती लोकप्रिय आहेत"
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Principia ani Isaac Newton
"प्रिन्सिपिया या ग्रंथात सुरूवातीला काही व्याख्या आणि गतीविषयीचे नियम न्यूटनने मांडले आहेत. त्यानंतर पहिल्या भागात कसलाही प्रतिरोध नसणा-या वस्तूंच्या गतिविषयी प्रमेयं आहेत. तिस-या भागात अवकाशातील ग्रहता-यांच्या रचनेविषयीची स्पष्टिकरणं दिलेली आहेत. प्रिन्सिपीया ग्रंथात न्यूटनने गुरूत्वाकर्षणाविषयीही लिहिलं आहे."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - An Essay on the Principle of Population ani Thomas Malthus
"थॉमस माल्थस हा जगातला लोकसंख्येच्या आणि जन्ममृत्यूच्या बदलत्या प्रमाणाविषयी मोजमापं आणि अभ्यास करणारा पहिला 'डेमोग्राफर' होता. त्यानंच अर्थशास्त्रातला 'लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स ' हा नियम शेतीचं निरिक्षण करून काढला होता. ॲन एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकामुळे ब्रिटनमध्ये सेन्सस ॲक्ट लागू केला गेला. यामुळे दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची पध्दत सुरू झाली."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Quran - Muhammad Paigambar
"इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पारंपारिक इस्लाम धर्माच्या धारणांप्रमाणे परमेश्वराचे अंतिम प्रेषित असलेले मुहम्मद पैगंबर यांनी साधारणपणे इ.स.६०९ ते ६३२ या कालावधीमध्ये 'कुरआन' मधला संदेश अवतरीत केला. प्रत्यक्ष अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांना 'कुरआन' चा संदेश सांगितला आणि तो एकदम न सांगता थोडाथोडा सांगितला असे मानण्यात येतं. आज जगभरात लोकसंख्येच्या २४ टक्क्यांहून अधिक मुस्लिम वास्त्यव्य करतात. कुरआन मध्ये 'मी कोण आहे ? माझ्या निर्मितीचा हेतू काय?माझं जगाशी नातं काय? जीवन आणि मृत्यू काय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. कुरआनमध्ये शांतीचा संदेश आहे, मात्र ज्यावेळी संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल आणि स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यावेळी युध्द करावं असंही सांगितलं आहे. 'ला इलाह इल्लिल्लाह मुहम्मद रसूल्लिल्लाह ' म्हणजेच अल्लाहशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे असं म्हटलं आहे आणि यालाच कुरआनची मुख्य शिकवणही मानतात."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Art of War - Sun Tzu
"द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकाचा अभ्यास फक्त केवळ युध्दातले नेतेच करतात असे नाही; तर चीन, जपान, रशिया, व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांतल्या डावपेच (स्ट्रॅटिजी) ठरवणा-या गटांनीही केला आहे. चीनच्या नागरी युध्दाच्या वेळी माओ-त्से- तुंग यानं या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक डावपेच वापरले होते. आजही अनेक सैनिकी शाळांत या ग्रंथाचा वापर केला जातो. केवळ युध्दासाठीच नाही तर व्यापार, उद्योग, व्यवस्थापन, खेळ आणि राजकारण या क्षेत्रांतही हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे."
Deepa Deshmukh (Author), Deepti Dandekar (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer