Browse audiobooks narrated by Amogh Chandan, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Globalisation & its Discontents - Joseph Stiglitz
"जागतिकीकरणानंतर जग हे छोटं खेडं झालं आहे या आशयाची वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे जगातील कोणतीही वस्तू सर्वांना उपलब्ध होऊ लागली आहे. एके काळी महाग व फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असणा-या वस्तू मध्यमवर्गाला उपलब्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे श्रीमंत आणि गरीब यातील दरीही वाढते आहे. सगळ्याच देशांनी एकसारखी धोरणं आखण्या ऐवजी आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन धोरणं आखायला हवीत असे या पुस्तकात स्टिग्लि्टझ म्हणतो."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - The Selfish Gene - Richard Dawkins
"उत्क्रांतीचा जनुककेंद्रीत प्रवास सांगणारं द सेल्फिश जीन हे पुस्तक उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजला जातो. उत्क्रांती घडत असताना सजीवांमधला जीन स्वतःच्या आस्तित्वासाठी सतत आपल्या जनुकांमध्ये बदल घडवत असतो. त्याच्या या स्वार्थी वागण्यामुळेच बदलत्या नैसर्गिक परिस्थितीशी त्याला जुळवून घेता येते आणि नव्या प्राण्यांमध्ये अनुकूल असे बदल घडतात. या बदलांनाच म्युटेशन असे म्हणतात. वंश टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेतुन ही जनुकं कशी बदलतात याचे चित्रण हे पुस्तक करते. उत्क्रांती समजून घेण्याकरता हे आवश्यक आहे."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Understanding Media -Marshall McLuhan
"एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला डिजीटल क्रांती झाली. संपूर्ण जग इंटरनेटम. झालं. मिडीया टेक्नॉलॉजीच्या प्रगतीने तर प्रगतीचा कळस गाठला. १९६४ साली मार्शल मॅकलुहाननं जगावर परिणाम घडवणारं अंडरस्टॅंडिंग मिडीया : द एक्सटेंशन ऑफ मॅन हे पुस्तक लिहिलं. ६० च्या दशकानंतर इलेक्ट्रॉनिक मीडीया आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि ५० वर्षांनंतर माध्यमे कशा प्रकारची असतील याची संगतवार मांडणी मॅकहुलाननं या पुस्तकात केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मिडीयाचं रूपांतर दृश्य स्वरूपात झालं की माणसाचं वर्तन समूहाकडून व्यक्तिवादाकडे जाईल."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Man's Search for Meaning - Viktor Frankl
"आपलं आयुष्य म्हणजे सुखाचा शोध नसून अर्थपूर्ण जगण्याचा शोध आहे. आपल्या आयुष्यात आपलं काय होणार यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्याला काय वाटतं यावर आपण नक्की नियंत्रण ठेऊ शकतो. अर्थपूर्ण जगण्यासाठी आपला मार्ग आपणच निवडायला हवा असं व्हिक्टर फ्रँकल म्हणतो. डॉ. व्हिक्टर फ्रँकल हा हिटलरच्या छळछावणीतून वाचलेला कैदी होता. लोगोथेरपी या संकल्पनेचा जनक म्हणूनही तो ओळखला जातो. त्यानं छळछावणीतल्या अनुभवांवर आधारित आपल्या आस्तित्वाचा अर्थ शोधण्याकरता वापरलेल्या मानसोपचारांबद्दल या पुस्तकात लिहिलं आहे."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Marriage And Morals - Bertrand Russell
"बर्ट्रांड रसेल हा जगप्रसिध्द ब्रिटीश गणिततज्ञ, तत्वज्ञ, वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ, राजनीतीज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो. संघटित धर्मांवर त्याचा विश्वास नव्हता आणि लैंगिक स्वातंत्र्याला तो महत्व देत असे. तो युध्दविरोधी आणि शांतताप्रिय होता. १९२९ साली रसेलचं मॅरेज ॲंड मॉरल्स हे पुस्तक प्रसिध्द झालं आणि जगभर खळबळ माजली विवाहसंस्था आणि नीतीमुल्यं यांच्यावर भाष्य करणा-या या पुस्तकाने इतिहास घडवला. कुटुंबसंस्था, मुलं, त्यांचे संगोपन आणि स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य याबद्दल रसेलने विवेचन केले आहे."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Experiments in Plant Hybridisation - Gregor Mendel
"वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगोर मेंडेल या धर्मगुरूने अनुवंशिकतेचे गुढ उलगडले आणि त्यातून अनुवंश शास्त्र ही नविन विद्याशाखा सुरू झाली. त्याने वनस्पतींवर केलेल्या प्रयोगांमधुन अनेक सिध्दान्त मांडले या सिधान्तांमुळे पुढे मानवांमध्ये निर्माण होणा-या अनुवंशिक विकृतींचा अभ्यास करणे शक्य झाले. माणसाच्या शरिरातील प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्रे असतात व २३ जोड्या असतात. या गुणसुत्रांमध्ये काही कमतरता किंवा अधिक्य निर्माण झाले तर काही विकृती मानवात निर्माण होउ शकतात या सिध्दान्तामुळे या ग्रंथाचे मोल मानवी कल्याणासाठी अधिक आहे."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
"प्राचीन ग्रीसमध्ये अभिजात काळात ॲरिस्टॉटल हा प्रचंड प्रभावी तत्वज्ञ होऊन गेला. वर्क्स या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिधान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत. तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं, आत्मा, निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग, अशा अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात त्याने आपली मते मांडली आहेत. निसर्ग आणि प्राणीजात परस्परपूरक आहेत असे त्याचे मत होते. विश्वाच्या रहस्याबरोबरच त्याला कविता आणि नाटक या विषयातही रस होता."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Systema Naturae ani Carl Linnaeus
"निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्याआधी निघाली तेव्हा त्यात २३०० पाने होती. आणि त्याचे तीन खंडही निघाले होते. या संपूर्ण प्रकल्पात त्याने वनस्पतींच्या सुमारे ७७०० तर प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून त्यांचे वर्गीकरण केले होते. युरोपमध्ये त्या काळात माहिती असणा-या सर्व सजीवांचे वर्गीकरण त्यांनी केलं होतं!"
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Utopia ani Sir Thomas More
"थॉमस मो(अ)र चं युटोपिया हा ग्रंथ १५१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यावेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं आहे. युटोपिया हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे. पहिला भाग डॉयलॉग ऑफ कौन्सिल या नावानं ओळखला जातो. तर दुस-या भागाला डिस्कोर्स ॲन युटोपिया असं म्हटलं जातं. या पुस्तकात गाव, प्रवास, व्यापार, वाहतूक, धर्म, लष्कर अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबदद्ल बोललं गेलंय. या पुस्तकात जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. युटोपिया या बेटावरचं काल्पनिक सामाजिक व राजकीय चित्र मोरनं असं रंगवलं होतं की हे लेखन वास्तवातल्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे उपहासात्मक आणि टीकात्मक म्हणून पाहिलं गेलं..."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
"जीन्स आणि बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्ड आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस, तितक्याच चक्रावणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्वसनीय, तितक्याच थरारक! या यशोगाथांच्या मागे नेमकं काय असतं? हे रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं 'बोर्डरुम' हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहातेलिखित पुस्तक ऐका, अमोघ चंदन यांच्यासह."
Achyut Godbole, Atul Kahate (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Arthashastra - Kautilya
"'माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ असतो' असे सांगतानाच चाणक्याने शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचे आहे हे पदोपदी सांगितले. चाणक्याने लिहिलेल्या ग्रंथात शिस्त, अधिका-यांची कर्तव्ये, कायदा, उद्योग, राष्ट्राची आचारसंहिता, कार्यालयीन हिशोब आणि कामकाज, व्यापार, जकात आणि उत्पादन शुल्क, मालमत्ता. ठेवी, कर्जवसूली, परराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली आहे. कामगारांचे हक्क, संरक्षण, मजूरी आणि कामाचे स्वरूप याविषयी त्यानं विस्ताराने लिहून ठेवलं आहे. त्यानं संबंधित अधिका-यांच्या हलगर्जी पणासाठी त्यांना कठोर दंड करावा असही म्हटलं आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनिती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bhagwadgeeta - Vyas
"'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. ( म्हणजे, जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारण, भगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद््गीतेने प्रभावित केले आहे."
Deepa Deshmukh (Author), Amogh Chandan (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer