Browse audiobooks by Shripad Joshi, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Murder Case S02E10
"अभिमन्यू तर सध्या ब्रेकवर आहे. तरी तो आपली ड्यूटी निभावतोय. रिटार्यड पोलिस ऑफिसर दानवेंनी त्याला फोन करुन एक नाव सांगितलं. असं कोणाचं नाव सांगितलं असेल दानवेंनी ज्यामुळे त्याच्या तोंडून नकळत 'एसआरएच' हे शब्द निघाले. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान त्या एसआरएच ला पकडू शकेल? आहे तरी कोण हा एसआरएच? गृहमंत्री गटलेवार की अजून कुणी... ही केस अभिमन्यू सोडवू शकेल की त्याचं करिअर संपुष्टात येईल?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E07
"अभिमन्यूला शिंदेचा पत्ता तर कळलाय. पण शिंदेसारखा शातीर माणूस अभिमन्यूच्या हाती लागेल? की अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी शिंदेनेच रचलेला हा सापळा आहे? दुसरीकडे राजीव नागनाथनच्या मदतीने अभिमन्यूने जिलेटिन कांड्या कोणत्या कंपनीने ऑर्डर केल्या होत्या हे शोधून काढलंय. कोण आहे तो जिलेटिन कांड्या मागवणारा? त्याचं आणि शिंदेचं नातं काय आहे? हे अभिमन्यू शोधून काढेल की स्वतःच एका मोठ्या चक्रव्यूहात सापडेल?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E04
"ज्यावेळी अभिमन्यूच्या हाती ती व्हिडिओ क्लिक लागली त्याच वेळी पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती. एक माणूस काही खोके लोड करत होता. सॅम डिसूजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते. कोण असतील ती माणसं? काय असेल त्यांचा प्लान... आणि अभिमन्यूला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं काय दिसलं होतं, ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले गेले? अभिमन्युला निनावी फोन करणार्या माणसाचा ट्रेस सापडतो. तो अज्ञात माणूस आता अभिमन्युच्या ताब्यात येईल का? सायमल्टेनियस्ली शोध घेतल्यानंतर अभिमन्युला शांतीलालच्या डायरीत 'एसआरएच' हे नाव सापडतं. कोण असेल हा 'एसआरएच?' हाच तर मास्टर माईंड नसेल ना?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E02
"अभिमन्यूने रामलाल यादवचा शोध घेण्यासाठी मोरे आणि पाटीलला कामाला लावलंय. ते दोघं यादवच्या मूळापर्यंत कसे पोहोचतील? युट्युबर विनिता गुजर मेली... जिलेटिनच्या कांड्या, बारगर्ल आणि आता विनिता गुजर. नक्की काय चाललंय मुंबईत? ज्या गाडीने ठोकर मारल्यामुळे विनिता गुजर मेली, त्या गाडीचा ड्रायव्हर गंभीररित्या जखमी झालाय. या तिन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत का? हा मोठा प्रश्न अभिमन्यूसमोर आ वासून उभा आहे. पण एक पॉजिटिव्ह न्यूज त्याला मिळते. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध लागतो. आता त्याला ताब्यात घेतलं की सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल. पण आहे तरी कोण तो? त्यानेच ती गाडी सॅम डिसुजाच्या घराबाहेर उभी केली असेल का? पण का? कारण काय?...."
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E03
"अभिमन्यूवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सबंध पोलिस डिपार्टमेंट हलतं. राज्य सरकारही खाडकन जागं होतं. मीडियामध्ये चर्चा होते. त्याचवेळी सॅम डिसूजाच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली, ही बातमी मिडीयात लीक होते. रामलाल यादवच्या घरी येणारा तो मारेकरी अतिरेक्यांसोबत मिळालेला तर नसेल ना? शांतीलाल भाटियाची गाडी रामलाल यादवला कोणी दिली असेल. रामलाल हा शांतीलालचाच तर माणूस नसेल ना? अचानक जिलेटीनची गाडी आम्हीच ठेवली असं सांगणार्या एका तथाकथित दहशतवादी संघटनेचा व्हीडीयो वायरल होतो. त्यात केळवा बीच जवळ एक डेड बॉडी सापडते..."
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E01
"सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, 'रक्षकच भक्षक आहे...'"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E06
"रफिकचा खून पोलिस चौकीतच झाल्यामुळे पोलिस मिडियाच्या रडारवर आलेत. इन्स्पेक्टर अभिमन्यू अस्वस्थ झालाय. त्याच्या डोळ्यांसमोरुन पुरावे नष्ट होत होते. आणि तो बघण्यापलीकडे काहीच करु शकत नव्हता. पण या सगळ्यामध्ये दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, रफिकचं पोस्ट-मॉर्टन केल्यानंतर डॉ. सिब्बल यांच्या हातात खूप मोठा क्ल्यू लागलाय? नेमकं काय सापडलंय डॉ. सिब्बलना आणि याचा अभिमन्यूला कसा फायदा होईल?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E08
"पुन्हा एकदा 'एसआरएच... कोण आहे हा 'एसआरएच? अभिमन्यूचा संशय तर खरा नाहीये ना? अभिमन्यू मुख्यमंत्र्यांना भेटला. त्याच्या मनात जे आहे ते मुख्यमंत्री पवार साहेबांनी ओळखलंही. मग आता मुख्यमंत्री पवार आणि अभिमन्यू मिळून गृहमंत्री गटलेवार ह्यंना अडवलतील का? की मुख्यमंत्री पवार ह्यांचा यामध्ये वेगळाच काहीतरी डाव आहे? काही राजकीय खलबतं केली जात नाहीयेत ना? आणि गटलेवरांना अडकवता अडकवता अभिमन्यू स्वतःच या पॉलिटिकल गेममध्ये चेकमेट होईल? यावेळी राजीन नागनाथन त्याच्या मदतीला धावून येईल का?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E09
"अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Marathi] - Murder Case S02E05
"राजीव नागनाथन अभिमन्युला सांगतो की मोना त्याची मैत्रिण होती आणि तिला काहीतरी खबर लागलेली होती. गृहमंत्र्यांवर त्याचा संशय आहे हेही बोलून दाखवतो. खरंच ह्या सगळ्या कारस्थानात गृहमंत्र्यांचा हात असेल का? की ही केवळ राजीवची थियरी आहे? राजीव हेही सांगतो की मोना हॅरीची कीप होती. ती व्हिडिओ क्लिप आणि आता राजीवच्या तोंडून पुन्हा हॅरीचं नाव... अभिमन्यू हॅरीवर नजर ठेवतो... तेव्हा त्याचे काळे धंदे त्याच्या लक्षात येतात. अभिमन्युला एका व्यक्तीवर संशय येतो की ती हुडीवाली व्यक्ती हीच आहे... अभिमन्यू त्या हुडीवाल्या व्यक्तीला ताब्यात घेईल का? की पुन्हा पुरावे त्याच्या हातातून निसटतील?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
"अभिमन्यू आणि रेणुका पुण्याला तिच्या मावशीकडे आलेत. रेणुकाला वाटतं की पेंडिंग हनिमुन ते साजरा करतील. पण पोलिसी वर्दी अभिमन्य़ूची पाठ सोडायला काही तयार नाही ... अनुराधा पेंडसे आजींच्या पुण्याच्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामुळे त्यांची झोप उडालीय अनुराधाबाईंनी अभिमन्यूकडे मदत मागितलीय. अनुराधाबाईंना भास होतात ? की त्या वाड्यावर डोळे लावून बसलेला बिल्डर त्रास देतोय की पैशांची हवस असलेला दिनेश त्रास देतोय की त्यांचा सख्खा मुलगा तन्मय त्यांना धमकावतोय? ही मिस्ट्री अभिमन्यू सॉल्व्ह करु शकेल का? या सर्वांमध्ये रेणुका त्याला कशी मदत करेल? चला ऐकूया वाड्याचं रहस्य..."
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Aastad Kale (Narrator)
Audiobook
[Hindi] - Ashish Murder Case S01E05
"मर्डर का मास्टर माइंड: इंस्पेक्टर अभिमन्यु के दायें हाथ, हवलदार पाटिल को आशीष की खोई हुई BMW कार मिलती है. साथ ही कार में एक और महत्वपूर्ण सुराग भी मिलता है. सारी कड़ियों को जोड़ते हुए अभिमन्यु प्रधान इस निष्कर्ष पर पहुँचता है कि orphanage की कर्ता-धर्ता, स्टेला का इसमें हाथ है. वो orphanage की आड़ में sex racket चलाती है. क्या स्टेला ही है असली मुजरिम या फिर कोई और? क्या इंस्पेक्टर अभिमन्यु आशीष के असली हत्यारे को बेनकाब कर पायेगा?"
Jayesh Mestry, Shripad Joshi (Author), Nishka Raheja, Uplaksh Kochhar (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer