"आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त 'as a friend' हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?"
"हातातोंडाशी आलेल्या केसमधला एक suspect फरार झाला. मानसीला जीवे मारण्याची धमकी आली. Personal आणि professional अशा बाजू सांभाळताना निरंजनला ही केस सोडवण्यात यश येईल?"
"रेल्वे रुळावर पडलेल्या त्या बाईला अखेरचे श्वास संपण्याआधी कोणीतरी मदत करेल की धावत्या रेल्वेखाली रात्रीच्या काळोखात, कोणालाही कळण्याआधीच तिचा मृत्यू होईल?"
"पवन शेलारचा मृत्यू आणि मग साळवीचा. दोघांना आलेल्या चिठ्ठ्या आणि त्यांचे झालेले अपघात अगदी हुबेहुब. हे सगळं घडवून आणण्यामागे एकाच माणसाचा हात असेल का? आणि याचा अपर्णाशी काय संबंध?"
"अपर्णासारख्या गृहिणीकडे एक सिक्रेट बॅंक अकाऊंट आणि त्यात इतकी मोठी रक्कम? अपर्णानी तिचा नवरा आणि भाऊ या दोघांना सो़डून कोणाला नॉमिनी केलं असेल आणि का?"
"मोहीतचं नेत्रावर मनापासून प्रेम आहे असं तो तिला वारंवार भासवतोय पण प्रत्यक्षात मात्र तो असतो गार्गीबरोबर. आता मोहीतनी नेत्राला एक वेगळाच मुलगा boyfriend म्हणून चिकटवलाय. खरंच तो हे सगळं नेत्रासाठी करत असेल का?"